State Government provides financial assistance of Rs. 59.26 crore to ST 
कोल्हापूर

राज्य सरकारची एसटीला 59 कोटी 26 लाखांची अर्थिक मदत

शिवाजी यादव

कोल्हापूर, ः राज्यातील प्रवासी वाहतुकीच्या सक्षमी करणासाठी राज्य शासनाने मदतीची हात पुढे केला आहे. त्याचाच भाग म्हणून एसटी महामंडळाला 59 कोटी 26 लाखांचा निधी दिला आहे. यातून राज्यभरातील बसस्थानकांचे नुतनीकरण तसेच नव्या गाड्या घेण्यासाठी वापर होणार आहे. अर्थ संकल्पात केलेल्या तरतुदीनुसार राज्य शासनाने एसटीला ही अर्थिक मदत केली आहे. 
कोरोना लॉकडाउन काळात एसटीची प्रवासी सेवा दिर्घकाळ बंद राहीली. एसटीला रोजचा बारा कोटींचा तोटा सोसावा लागला, अशा स्थितीत कर्मचाऱ्यांचे पगार देता येणेही मुश्‍कील झाले. आता अनेक मार्गावर जुन्या गाड्या चालविल्या जात आहेत. त्याचा फटका प्रवासी व उत्पन्नवाढीस बसतो. परिणामी एसटीचा तोटा वाढतो आहे. 
ही बाब विचारात घेता एसटीची प्रवासी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी नव्या गाड्यांची खरेदी करणे, बसस्थानकांची अधुनिकीरण किंवा बांधकाम करणे, पायाभूत सुविधा सक्षमीकरण करणे अशी नियोजीत कामे आहेत. त्यासाठी निधीची गरज होती. राज्य शासनानेही अर्थसंकल्पात 500 कोटी रूपये सार्वजनिक सेवाच्या सक्षमी करण्यासाठी देण्याची तरतुद केली होती मात्र सद्या राज्य शासनाची अर्थिक स्थिती फारशी भक्कम नसल्याने या तरतुदीचा पहिला टप्पा म्हणून शासनाने एसटी महामंडळाला 59 कोटी 26 लाखांचा निधी दिला आहे. 
एसटीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

शहरी बससेवेला गती अपेक्षीत 
राज्यातील जवळपास 230 मार्गावरील कमी संख्येच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. परिणामी राज्यातील काही महत्वाच्या शहरातून मुंबईकडे जाण्यासाठी रात्री दहानंतर एसटीच्या आराम गाड्याची सेवा नाही. यात गाड्यांची संख्या कमी असल्याने ठरावीक मार्गावर रात्री सेवा मिळत वरील निधीतून एसटीच्या ताफ्यात नव्या गाड्या आल्या तरी मुंबई पुण्यासारख्या महत्वाच्या शहराकडील प्रवासी सुविधा सक्षम होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Shortage Rumor : युद्धाच्या अफवेने 'इंधन' भडकलं! मुक्ताईनगरमध्ये 500 लिटरच्या प्लास्टिकच्या टाक्यांत भरलं जातंय पेट्रोल-डिझेल; पाहा धक्कादायक Video

भीषण वास्तव! घरगुती गॅससाठी दाहीदिशा वणवण, अखेर हताश महिलेनं उचललं टोकाचं पाऊल; नेमकं काय घडलं?

Summer Fashion Tips: उन्हाळ्यात दिवसभर कूल, फ्रेश आणि सुपर स्टायलिश दिसायचंय? मग ‘हे’ फॅब्रिक्स नक्की ट्राय करा!

CSK vs RR: जड्डू... जड्डू... चाहत्यांच्या घोषणा ऐकून रवींद्र जडेजा खरंच झाला इमोशनल? Video तुफान Viral

ललित प्रभाकर की गश्मीर महाजनी सगळ्यात जास्त कोण आवडतं? चाहत्यांच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीनं दिलं उत्तर, म्हणाली...

SCROLL FOR NEXT