State government relief for prostitutes 
कोल्हापूर

वारांगनांसाठी राज्य शासनाचा मोठा दिलासा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - वेश्‍या व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या वारांगनांसाठी राज्य शासनाने नुकताच महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोना काळातील अर्थसहाय्य म्हणून ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यासाठी ओळख निश्‍चित केलेल्या वारांगनांना दरमहा पाच हजार रुपये, तर ज्यांची मुले शाळेत जातात त्यांना अतिरिक्त अडीच हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. 

तीन महिन्यांच्या कालावधीसाठी ५१ कोटी अठरा लाख ९७ हजार पाचशे रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून उपलब्ध करून देण्याबाबतचा आदेश आज शासनाने दिला आहे.
वेश्‍या व्यवसायात कार्यरत महिला व मुलांसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने राज्यात तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार ३२ जिल्ह्यातील वारांगनांना मदत दिली जाणार आहे. 

नॅशनल एडस्‌ कंट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) या संस्थेकडून संबंधित वारांगणांची ओळख निश्‍चित केली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारच्या ओळखपत्राशिवाय ही मदत वितरित केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली जाणार आहे. 

जिल्ह्यातील पाचशे वारांगनांना मिळणार मदत
कोल्हापूर जिल्ह्यातील पाचशे वारांगनांना आणि चोवीस बालकांना ही मदत दिली जाणार असून ही रक्कम एकूण ७६ लाख ऐंशी हजार इतकी आहे. राज्यातील एकूण लाभ मिळणाऱ्या वारांगनांची संख्या तीस हजार ९०१ इतकी असून सहा हजार ४५१ इतकी बालकांची संख्या आहे.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT