Status in the surgeon's office in kolhapur 
कोल्हापूर

‘साहेब.. नाहीत.’ ‘कुठे गेलेत?’ ते इचलकरंजीला गेलेत.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - ‘साहेब.. नाहीत.’ ‘कुठे गेलेत?’ ते इचलकरंजीला गेलेत. ‘त्यांचा पदभार कोणाकडे आहे किंवा दुसरे वैद्यकीय अधिकारी कुठे आहेत?’ ‘काही माहिती नाही.’ ‘साहेब कधी येतील?’ ‘काही सांगता येत नाही,’ अशी उत्तरे आज जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात येणाऱ्या लोकांना ऐकायला मिळाली.

इचलकरंजीतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शल्य चिकित्सकांनी आयजीएम रुग्णालयात जाण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार शल्य चिकित्सक आयजीएम रुग्णालयाकडे गेले. त्यासोबत आज निवासी वैद्यकीय अधिकारी व २२ कर्मचाऱ्यांनाही इचलकरंजीला बोलवले. त्यामुळे शल्य चिकित्सक कार्यालयात प्रशासकीय कामांचा खोळंबा झाला. अनेक लोक वैद्यकीय बिले किंवा अन्य वैद्यकीय कागदपत्रांसाठी येथे येत होते. मात्र साहेबही नाहीत, मॅडमही नाहीत आणि कर्मचारीही नाहीत, असे चित्र शल्यचिकित्सक कार्यालयात होते. त्यामुळे शल्यचिकित्सकांच्या बंद केबिनवर लावलेली चिठ्ठी वाचून लोक परत जात होते.

शल्य चिकित्सक नसतील अन्य कोणत्या अधिकाऱ्यांकडून कामेकरून घ्यावीत, याचे नेमके उत्तर मिळत नसल्याने लोकही गोंधळात पडले. ही बाब विचारात घेता किमान निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तरी त्यांच्या कक्षात उपस्थित असणे महत्वाचे आहे, अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त होत होती.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नागपुरात डीजे ‘सायलेंट’! ३ नोव्हेंबरपर्यंतचे आदेश; दहीहांडी, पोळा, गणेशोत्सव, नवरात्र आणि धम्मचक्रप्रवर्तन दिनीही राहणार बंद

Pune Traffic Update : पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल; ४-५ सप्टेंबरला ‘हे’ रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्गांची यादी पाहा

Vidyanand Bapat Assault : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण कोण? नेमकी कशामुळे केली मारहाण?

Marathi News Live Updates : नागपुरात डॉल्बी, प्लाझमा आणि मल्टीलेयर साऊंड सिस्टिमवर बंदी, आजपासून १ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू

Mumbai Viral Video : एका बाजूला अरबी समुद्र, दुसऱ्या बाजूला विमानतळ! मुंबईतील हे ८० कोटींचं घर पाहीलंत का? सोशल मीडियावर हवा...

SCROLL FOR NEXT