Stay In The Field For Crop Protection Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

राखणीसाठी रात्रंदिवस शेतात मुक्काम

दिनकर पाटील

नेसरी : हेब्बाळ-जलद्याळ (ता. गडहिंग्लज) परिसरातील लिंगनूर कसबा नेसरी, मांगनूर तर्फ सावतवाडी, जांभूळवाडी, वाघराळी, बटकणंगले, बिद्रेवाडी गावात शेतकरी वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतात मुक्काम करावा लागत आहे. हातातोंडाला आलेली ऊस, शाळू, मक्का पिके वन्य प्राणी फस्त करत आहेत. वन्य प्राण्यांच्या त्रासापासून शेतकरी त्रस्त झाला आहे. वन्य विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

सर्वाधिक धोका गव्यांच्या कळपांचा आहे. परिसरात वीस-पंचवीस गव्यांचा कळप वावरतो. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी अनेक उपाययोजना करत आहेत. शेतात भुजगावणे उभे करणे, कापडे बांधणे, वाद्य वाजवणे, वेगवेगळे आवाज काढणे, फटाके वाजवणे याचबरोबर राखण करण्यासाठी पाळीव कुत्र्यांचा वापर केला जात आहे. रात्री गव्यांचा, तर दिवसा पक्षांचा त्रास सहन करावा लागतो आहे. डोंगर परिसरात गव्यांचा मुक्काम असतो. 

जीव धोक्‍यात घालून राखण 
पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी वर्ग जीव धोक्‍यात घालून राखण करत आहे. हेब्बाळ-जलद्याळ, लिंगनूर कसबा नेसरी, मांगनूर तर्फ सावतवाडी, वाघराळी चार गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक रणधुमाळी रंगत असतानाच शेतकरी पिकांची राखण करण्यात मग्न असल्याचे चित्र पहायला मिळते आहे. ऊस तोडणी हंगाम सुरू असल्याने गव्यांच्या कळपाने शाळू पिकांकडे मोर्चा वळविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT