chitra wagh esakal
कोल्हापूर

सभेवरील दगडफेकीनंतर चित्रा वाघ म्हणाल्या, गृहराज्य मंत्र्यांचीच इज्जत धोक्यात..

'समोर येण्याची हिंमत नसलेल्यांनी माणसं पाठवून दगडं फेकण्यात आली'

सकाळ डिजिटल टीम

'समोर येण्याची हिंमत नसलेल्यांनी माणसं पाठवून दगडं फेकण्यात आली'

सध्या कोल्हापुरात उत्तरच्या निवडणुकीने वेग घेतला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण तापलं आहे. उत्तरमधील पोटनिवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून भाजपा आणि महाविकास आघाडी नेत्यांमध्ये आरोपप्रत्यारोप पहायला मिळाले आहेत. भाजपने सत्यजित कदम यांना तर कॉंग्रेसनं जयश्री चंद्रकांत जाधव यांना तिकिट दिलं आहे. सत्यजित कदम यांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ कोल्हापुरात आल्या असताना त्यांच्या जाहीर सभेवर दगडफेक झाली असल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे. याप्रकरणी तक्रार नोंदवणार असल्याचं चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान आज सकाळी या घटनेसंदर्भात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्षे काम करतोय पण अशा पद्धतीचा भ्याड हल्ला केला गेला. समोर येण्याची हिंमत नसलेल्यांनी माणसं पाठवून दगडं फेकण्यात आली. काही लोकांनी हा दावा असल्याचं म्हटलं, व्हिडिओ पाठवा असं म्हटलं. हे अनेपेक्षित होतं, कुणाला माहिती होतं असं होणार आहे. कोल्हापूरचा हा पहिलाच अनुभव आहे, मी इथं नेहमीच येते, अतिशय गोड माणसं कोल्हापुरमध्ये आहेत. निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये दहशतीचं वातावरण बघायला मिळालं असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

पुढे त्या म्हणाल्या, हल्लेखोरांनी घोषणाबाजी वगैरे काही केली नाही. त्याठिकाणी अंधाराचा फायदा घेत दगडफेक करणारे पळून गेले. राज्याला आणखी दोन गृहराज्यमंत्री आहेत हे सांगावं लागतं. महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर कोणी व्यक्त झालं आहे का? साताऱ्याच्या गृहराज्य मंत्र्यांच्याच गाडीचा पाठलाग केला गेला. गृहराज्य मंत्र्यांचीच इज्जत धोक्यात आहे, मग आमचं काय होणार? २०२१ मध्ये कोल्हापुरात काय काय झालंय ? कायदा सुव्यवस्थेतील भोंगळ कारभार आणि गृहराज्य मंत्री किती निष्क्रिय आहे ते समोर येईल असे म्हणत चित्रा वाघ यांनी सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT