Stone throwing on police in solapur 
कोल्हापूर

धक्कादायक ; उघड्यावर सुरू होता मटका, कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरच केली दगडफेक 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - सुभाषनगर चौकातील झाडाखालीच उघड्यावर सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच संशयितांनी जोरदार दगडफेक केली. दगडफेक करत पळून जाणाऱ्या या संशयितांनी पोलिसांना अर्वाच्च शिवीगाळही केली. या प्रकरणी तिघांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांच्याकडून मोबाईलसह 11 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

विष्णू काशिनाथ माने (वय 60, रा. बालाजी पार्क, आयसोलेशन हॉस्पिटलच्या मागे), विजय युवराज बागडे (वय 31, रा. जुना कंदलगांव नाका) आणि योगेश अभंगे (वय 42, रा. अमळनेर, जि. नगर) अशी संशयितांची नांवे आहेत. या तिघांकडून रोख पाच हजार 260 रूपये व मोबाईल मिळून 11 हजाराचा माल जप्त करण्यात आला.

 
सुभाषनगर चौकातील झाडाखाली उघड्यावर मोबाईलद्वारे कल्याण मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस या परिसरात कारवाईसाठी गेले होते. पोलिसांनी आपली ओळख सांगताच या संशयितांनी तिथून पळ काढला. पळून जाताना रस्त्यावरील दगड या पोलिसांच्या अंगावर भिरकावले, त्याचबरोबर पोलिसांना अर्वाच्च शिवीगाळही करण्यात आली.


विष्णू माने आणि विजय बागडे यांना पळून जाताना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी मूळ मालक योगेश अभंगे असल्याचे सांगितले. या तिघांवरही गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Government Land: पुणे जिल्ह्यात शासकीय जमिनींचा शर्तभंग; ३३० प्रकरणे उघड, ३५० कोटींच्या ३० ते ४० जागा शासनजमा

1980s चा ट्रेंड फॉलो केला... पण तेव्हाचा हा वादळी राजकीय किस्सा वाचा... सत्ता, पराभव, जेल अन् इंदिरा गांधींचं कमबॅक

Maharashtra Cooperative Bank: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ठेवींना मोठा फटका; वर्षभरात ६,३५० कोटींची घट, एनपीए ८.४४ टक्क्यांवर

US Open: झ्वेरेव सलग चौथ्यांदा ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये; फायनलच्या तिकिटासाठी कोणाविरुद्ध होणार लढती?

Engineering Student: आजी, मम्मी, पप्पा... सॉरी!’ अभियांत्रिकीच्या २२ वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; ‘छोटीला चांगले शिकवा...’ अशी चिठ्ठी

SCROLL FOR NEXT