Stop on 25 highways in state on March 11 to protest against non waiver of electricity 
कोल्हापूर

वीज बील माफ होत नसल्याच्या निषेधार्थ 19 मार्चला राज्यातील पंचवीस महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

संदीप खांडेकर

कोल्हापूर : संचारबंदीच्या काळातील घरगुती वीज बिल माफ होत नसल्याच्या निषेधार्थ येत्या १९ मार्चला राज्यातील‌ पंचवीस जिल्ह्यांत राष्ट्रीय व राज्य महामार्ग रोको आंदोलन होणार असल्याची माहिती महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. तत्पूर्वी, बुधवारी (ता. १७) माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिष्टमंडळाला भेट घडवून आणण्याचे आश्वासन दिले असून, त्यात काही सकारात्मक निर्णय झाला तर आंदोलन होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

होगाडे म्हणाले, "वीज बिल माफीबाबतचा घटनाक्रम पाहिल्यास सरकारकडून नौटंकी सुरू असल्याचे दिसत आहे. वीज बिलाच्या प्रश्नावर राज्य सरकारने वीज पुरवठा खंडित करणार नसल्याची व दोन्ही सभागृहात चर्चेअंती निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. मात्र, अधिवेशन काळात त्यावर कोणतीच चर्चा झाली नाही. केवळ अधिवेशन सुरळीत व्हावे, याकरता बोगस आश्वासन देण्यात आले. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी वीज पुरवठा खंडित करण्याची  कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली. ३०० युनिटपर्यंतच्या सर्व ग्राहकांना संचारबंदीच्या काळातील बिलात सवलत मिळावी, अशी आमची मागणी आहे. त्याचा २ कोटी २० लाख ग्राहकांना लाभ होणार आहे. त्याकरिता केवळ ९ हजार कोटी रुपये सरकारला खर्च करावे लागतील.

ते म्हणाले, "कर्नाटकने मे २०२० मध्ये सर्वसामान्यांना रोख पाच हजार रुपयांची मदत दिली. केरळ, गुजरात व मध्यप्रदेशने वीज बिलांत ५० टक्के सवलत जाहीर केली. तसा निर्णय महाराष्ट्र सरकार घेऊ शकलेले नाही. वस्तुतः घरगुती वीज ग्राहकांनी पहिल्यांदाच सवलत मागितली आहे. ती त्यांना द्यायला हवी. ती मिळत नसल्याने महागाव (जि. यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महामार्ग रोखण्याचा निर्णय घेतला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल सेक्युलर, जनसुराज्य शक्ती पक्ष, शिवसेना व अन्य विविध पक्ष व संघटना आंदोलनात सहभागी होतील."

पत्रकार परिषदेस बाबासाहेब पाटील-भुयेकर, विक्रांत पाटील-किणीकर, प्रा. सुभाष जाधव, रमेश मोरे, उदय नारकर, संदीप देसाई, संभाजी जगदाळे, समीर पाटील, शिवाजी माने, शरद पाटील उपस्थित होते.

अधिवेशनाच्या सुरूवातीला थकबाकीदार वीज ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्यास स्थगिती देणे आणि शेवटच्या दिवशी स्थगिती उठविणे हा राज्यातील विधानसभा सभागृहाचा अवमान व हक्कभंग आहे. त्याचबरोबर राज्यातील कोरोनाग्रस्त गरीब सव्वादोन कोटी वीज ग्राहकांची क्रूर चेष्टा आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
 

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 विश्वचषक 2026 प्रसारणावरून गोंधळ; ICCचा मोठा खुलासा, JioStar करार मोडल्याच्या अफवा फेटाळल्या

UPSC Exam: ‘यूपीएससी’चा मोठा निर्णय! 'या' उमेदवारांना मिळणार सोयीनुसार परीक्षा केंद्र

Pune Marathon : मॅरेथॉन दिवशी विद्यापीठात वाहनबंधी; धावपटूंसाठी विशेष शटल बस व पार्किंगची स्वतंत्र सोय!

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

SCROLL FOR NEXT