stop for shivsena dominated possibility in shiye kolhapur new changes 
कोल्हापूर

शिवसेनेला रोखण्यासाठी नवी सत्ता समीकरणे ?

अभिजित कुलकर्णी

शिये (कोल्हापूर) : येथे सत्ताधारी शिवसेनेचा वारू रोखण्यासाठी नवीन सत्ता समीकरणे तयार होण्याची शक्‍यता आहे. यासाठी स्थानिक गट एकत्रित येऊन सत्ताधारी आघाडीला शह देण्यासाठी एकास एक अशी लढत घडवून आणतील. शिवसेनेनेही अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील सत्ताधारी आघाडीच्या केंद्रस्थानी आहेत, तर तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष सर्जेराव काशीद विरोधी बाजूने मोर्चेबांधणी करीत आहेत.   

शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी शिवसेना स्वबळावर, तर काही प्रभागात महाविकास आघाडीच्या प्रयोगात शिवसेना पुन्हा सत्तेत राहील अशी शक्‍यता सत्ताधारी आघाडीत वर्तवली जात आहे. शिये जिल्हा परिषद मतदारसंघात २०१२ ते २०१७ या कालावधीत बाजीराव पाटील, २०१७ नंतर शिवसेनेच्या जि. प. सदस्या मनीषा कुरणे यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर सत्ता राखण्याचा प्रयत्न शिवसेना करेल. मात्र, दुरंगी लढत झाल्यास अटीतटीचा सामना होणार आहे. 

काही दिवसात गोकुळ, व छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणुका होणार आहे. यात महाविकास आघाडीचा प्रयोग होणार असल्याने ग्रामपंचायतीची समीकरणे बदलणार आहेत. यामुळे आमदार पी. एन. पाटील गटाचे, माजी आमदार महादेवराव महाडिक गटाचे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्रित येण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे, तर शिवसेनेसोबत मंत्री सतेज पाटील गटाचे काँग्रेस कार्यकर्ते जुळवून घेण्याची 
शक्‍यता आहे. 

शेतकरी संघटनेचे ॲड. माणिक शिंदे यांनी अतिक्रमणधारक इच्छुक उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने इच्छुक असणारे अतिक्रमणधारक संकटात सापडले आहेत. 

दृष्टिक्षेपात...

  •  लोकसंख्या  : ९५०३ 
  •  मतदार : ६३५२ 
  •  प्रभाग : ६
  •  सदस्य : १७

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Latest Marathi News Updates : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Jabrat Poster: मैत्रीचा गोडवा सांगणारा ‘जब्राट’; पोस्टर लाँच, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली

Shivaji Maharaj: मुंबई पोलिसांच्या लाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा

Ganesh Festival 2025 : खरेदीसाठी बाजारपेठा गजबजल्या; पूजा आणि सजावटीच्या साहित्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT