Stop The Vangurla Route For The Morley-Pargad Road Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

मोर्ले-पारगड रस्त्यासाठी वेंगुर्ला मार्गावर रास्ता रोको

सकाळवृत्तसेवा

चंदगड :  मोर्ले-पारगड रस्त्याच्या कामाला सुरवात करण्याबाबत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक विलंब लावत असल्याचे कारण पुढे करीत आज आंदोलकांनी बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. हे काम सुरू करण्यासाठी वन विभागाने त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तहसीलदार विनोद रणावरे यांनी आंदोलनस्थळी येऊन दोन दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्‍वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. 

या रस्त्यासाठी पारगड पंचक्रोशी कृती समितीचे सदस्य रघुवीर शेलार, विद्याधर बाणे आदी दोन दिवसांपासून उपोषण करीत आहेत; परंतु वन विभाग आडमुठी भूमिका घेत असल्याने फलनिष्पत्ती काहीच नाही. या प्रकाराने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सकाळी अकराच्या सुमारास अचानक बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर ठाण मांडले. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक ठप्प झाली. 

गणेश फाटक म्हणाले, ""मोर्ले ते पारगडदरम्यान कोल्हापूर वन विभागाच्या हद्दीत सुमारे दोन किलोमीटरचे अंतर रस्त्यासाठी संपादित केले आहे. या जागेतून रस्ता करावा यासाठी प्रादेशिक वन विभाग कार्यालयाची मंजुरी आहे. असे असताना कोल्हापूर विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक विलंब करीत आहेत.''

दरम्यान, तहसीलदार विनोद रणावरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. दोन दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांची चंदगडला बैठक बोलावण्याचे आश्‍वासन दिल्यावर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. अंकुश पवार, मनोहर पवार, देवीदास पवार, आत्माराम बाणे, काडू पवार, महादेव गवस, प्रकाश चिरमुरे, अर्जुन तांबे, धोंडीबा बेर्डे, नागोबा शिंदे, नागराज गवस, देवीदास गडकरी यांच्यासह आंदोलकांनी सहभाग घेतला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attacked : मोठी बातमी! तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सोनारपूरमध्ये मारहाण; हिंसाचारात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेल्यानंतर हल्ला

IPL फायनलपूर्वी RCB चाहत्यांना मोठा धक्का! सेलिब्रेशनवर पोलिसांकडून बंदी; मोठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

Latest Marathi Update Live: मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, दोन जखमी, दोन ठार

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

SCROLL FOR NEXT