The story of the father in uniform, he should only call him "Baba" 
कोल्हापूर

वर्दीतल्या बापाची कहाणी, त्यांनी केवळ "बाबा' अशी हाक मारावी...! 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : त्यांची नोकरी पोलिस खात्यातील, 20 वर्षापूर्वी लग्न झाले, सुखाचा संसार सुरू असतानाच संसारवेलीवर फुल उमलले आणि आनंदाला पारावार उरला नाही. चार- पाच वर्षानंतर मात्र मुलगा बोलत का नाही, हालचाली जलद कशा नाहीत, अशा प्रश्‍नांनी त्यांना घेरले आणि अखेर तो मतिमंद असल्याचे समोर आले.

पुढच्याच वर्षी दुसरा मुलगा झाला. तोही तसाच होता. तरीही त्यांनी हार मानली नाही. मुलांवर योग्य उपचार करून त्यांना बरे करण्याचा ध्यास घेतला. पोरांनी मला केवळ "बाबा' अशी हाक मारावी, एवढीच या बापाची अपेक्षा. मात्र नियतीला कदाचित ते मान्य नव्हते. धाकट्या मुलाचा सहा महिन्यांपूर्वी वयाच्या बाराव्या वर्षी अनपेक्षितपणे मृत्यू झाला आणि या बापाची माफक अपेक्षाही फोल ठरली. ही कहाणी आहे उत्तम खंकाळ या वर्दीतल्या हळव्या बापाची. 
श्री. खंकाळ पोलिस कॉन्स्टेबल, त्यांची प्रतिक व सार्थक ही दोन मुले. पत्नी शैला यांच्या सोबतीने मुलांना निरोगी आयुष्य मिळावे, यासाठी त्यांची धडपड. त्यासाठी त्यांना विशेष मुलांच्या शाळेत दाखल केले. सकाळी अकरा ते पाच अशी शाळेची वेळ. दोन्ही मुलांना संडास - लघवीची जाणीवही होत नव्हती. शाळेत असे काही घडल्यास शाळेतून फोन जायचा. दोघे पती- पत्नी लगेच शाळेत जाऊन मुलांना स्वच्छ करायचे. दोन्हीं मुलांना वेळच्या वेळी जेवण हाताने भरवत त्यांना खाऊ घालायचे. जन्मल्यापासून मुलांचे केसही तेच कापायचे. बारा तास ड्युटी आणि उरलेले बारा तास मुलांसोबत असा वेळ जाऊ लागला. दोन्ही मुले मतिमंद असल्याने नातेवाईकांनीही संबंध तोडले. 
धाकटा सार्थक दहा वर्षाचा झाला तरी चालू शकत नव्हता. अनेक ठिकाणी उपचार घेतल्यानंतर तो चालू लागला. त्याच्यात थोडीशी सुधारणा होत असतानाच यंदाच्या दिवाळीत त्याला अचानक ब्रेन ऍटॅक आला. त्याला दवाखान्यात न्यायचे तर थोरल्या प्रतिकला कोठे ठेवायचे हा प्रश्‍न होता. मग त्यालाही सोबत घेतले. प्रतिकला गाडीतच ठेवून या दांपत्याची सार्थकच्या उपचारासाठी धडपड सुरू झाली. पण, अवघ्या काही तासांतच सार्थकची प्राणज्योत मालवली. सार्थकच्या निधनानंतर प्रतिकही खचला. त्याची उणीव भासू लागली. सार्थकच्या जाण्यानंतर त्याचीही तब्येत वारंवार बिघडू लागली. दवाखान्यात दाखल करावे लागले. यावेळी मात्र त्यांच्या प्रयत्नांना 


मुले मतिमंद आहेत, याचे वाईट कधीच वाटले नाही. त्यांच्यासाठी मला जे जे करता येईल ते मी केले. लहान मुलगा सोडून गेल्यानंतर दुखः झाले. त्यांनी मला बाबा म्हटलं तरी आनंद होतो. त्यांच्या तोंडून बाबा ऐकण्यासाठी माझे कान आतुरलेत. त्यांच्या निरोगी आरोग्यासाठीच मी धडपडतो आहे. यात पत्नी शैलानेही साथ दिली. 
- उत्तम खंकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापरे! लोकप्रिय अभिनेत्रीचा भीषण अपघातात मृत्यू, वयाच्या ३० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Gold Price Crash : सोनं-चांदी स्वस्त झालं की गुंतवणूक बुडाली? 24 दिवसांत किमतीत तब्बल 60 हजारांची घसरण; काय घडतंय बाजारात? गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

Latest Marathi News Live Update : 'आप'चे आमदार पठाणमाजरा यांना ग्वाल्हेरमधून अटक

US Iran War Victory : अमेरिकेने युद्ध जिंकल्याचा ट्रम्प यांचा दावा, म्हणाले- इराणने आम्हाला मोठं गिफ्ट पाठवलं

Hotel Close Ratnagiri : रत्नागिरीत २५० हॉटेलचे ‘शटर बंद’, शिवभोजन थाळीही बंद सर्वसामान्यांची फरफट

SCROLL FOR NEXT