story of those people who make broom during diwali festival in nipani belgaum 
कोल्हापूर

'लक्ष्मी' बनविणाऱ्यांच्या नशिबी अंधारच !

राजेंद्र हजारे

निपाणी : दिवसेंदिवस पारंपरिक पद्धतीने वापरली जाणारी फडाची केरसुनी दुर्मीळ होऊ लागली आहे. मात्र केरसुनी बनविणारा मातंग जमात उदरनिर्वाहासाठी पारंपरिक व्यवसाय आजही टिकवून ठेवताना दिसून येत आहे. दिवस-रात्र राबून दिवाळीतील लक्ष्मी समजल्या जाणाऱ्या केरसुनी उत्पादकांच्या नशिबी अजूनही अंधारच आहे. दिवाळी तोंडावर आली असून यासाठी निपाणीतील मारूती बजंत्री कुटुंबीयांना सणाचे वेध लागले आहेत. 

दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला केरसुनीला 'लक्ष्मी'चा मान असल्याचे मानले जाते. त्यामुळे केरसुनी विकून कुटुंबाला हातभार लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या वयात बसून खायचे असते, त्या वयाच्या ६० व्या वर्षीही  मारुती आपल्या कुटुंबाला मदत करीत आहेत. अनेक वर्षे हा व्यवसाय करूनही नशिबी अंधारच दिसत आहे. कितीही कष्ट केले तरी मिळणारा मोबदला अल्पच आहे.

व्यापारी कवडीमोल भावाने केरसुनी विकत घेतात. यातून होणारी आर्थिक पिळवणूक उघड्या डोळांनी पाहावी लागते. तरीही बजंत्री कुटुंबीयांनी कोरोनाच्या काळातही हा व्यवसाय सुरू ठेवला आहे. यासाठी मागील तीन ते चार महिन्यांपासून केरसुनी बनविण्यासाठी सुरुवात केली आहे. सध्या हे काम संपले असून बाजारात विविध ठिकाणी त्याची विक्री केली जात आहे.

"परंपरागत असलेल्या या व्यवसायासाठी पत्नी, मुलगा, सून, नातवंडे यांचाही हातभार लागतो. सर्व जण राबूनही मोबदला फार कमी मिळतो. मात्र परंपरा म्हणून हा व्यवसाय करीत आहोत."

- मारुती बजंत्री, केरसुनी व्यावसायिक, निपाणी

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT