Strange demand, give someone else's check, not yours 
कोल्हापूर

अजब मागणी, तुमचा नाही तर दुसऱ्याचा धनादेश द्या

युवराज पाटील

शिरोली पुलाची  : थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करता टप्प्याटप्प्याने बिल भरून घ्या; अन्यथा कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. याबाबतचे निवेदन सहाय्यक अभियंता मणेर यांना दिले.

कर्मचाऱ्यांनी सक्तीने वसुली सुरू केली आहे. कर्मचाऱ्यांकडून महिलांनाही वेठीस धरण्याचे प्रकार घडत आहेत. वीज बिलापोटी काही रक्कम भरण्याची तयारी दर्शवून, पुरवठा खंडित करू नका अशी विनंती केल्यानंतरही संपूर्ण रक्कम भरण्याची सक्ती केली जात आहे. बिलापोटी पुढील तारखेचा धनादेश द्या, धनादेश नसल्यास दुसऱ्याचा नावाचा द्या; अन्यथा वीज खंडीत करण्याची धमकी कर्मचारी देत आहेत. हा प्रकार समजल्यानंतर शिवसेना शहर प्रमुख राजकुमार पाटील, नेते अनिल खवरे, युवासेनेचे मुकुंद नाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सहाय्यक अभियंता मणेर व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. याबाबत मणेर यांनी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कारवाई सुरू असल्याचे सांगितले. तेव्हा आदेशाची प्रत दाखवण्याची मागणी केली. ग्राहकांकडून टप्प्याटप्प्याने रक्कम भरून घ्या, विद्युत पुरवठा खंडित करू नका अन्यथा शिवसेना स्टाईल हिसका दाखवून, कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला. 
सरपंच शशिकांत खवरे, उपसरपंच सुरेश यादव यांनी नागरिकांना विश्वासात घेऊन बिले वसूल करण्याच्या सूचना दिल्या. उपशहरप्रमुख अशोक खोत, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, प्रल्हाद खोत, उत्तम पाटील, आनंद दरेकर, अमर चौगुले, सुनील जाधव, यूनुस मुल्ला, सुरेश राठोड, तलाठी निलेश चौगुले आदी उपस्थित होते. 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT