Kolhapur News : कितीही ताकद असली तरी विरोधकांना गृहीत धरायचे नाही, हे राजकारणातील सूत्र हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या १९७१ च्या निवडणुकीत दत्ताजीराव कदम यांनी अवलंबले.
मोठा मतदारसंघ असूनही त्यात जराही कसूर न सोडता त्यांनी जोरदार प्रचार केला. उमेदवार तीन असले तरी लढत दुरंगीच झाली. त्यात कदम यांनी ८४ हजार ९८५ मतांनी विजय मिळवला. त्यांच्या विजयाने काँग्रेसला जिल्ह्यात मोठे बळ मिळाले.
इंदिरा गांधी यांच्यामुळे काँग्रेस पक्षाचा सर्वत्र प्रभाव होता. त्यातही हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे बडे नेते होते. त्यांच्यातील सुप्त राजकारण मोठे होते. त्यातून पुढे जाणे महत्त्वाचे होते.
रत्नाप्पा कुंभार, सा. रे. पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे, बाळासाहेब माने हे नेते असताना सहकारात काम करणाऱ्या दत्ताजीराव कदम यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. कदम यांचे सहकारातील काम सर्वांना सोबत घेऊन जाणारे होते.
त्यावेळी शेतकरी कामगार पक्षही मोठा होता. त्यांच्याकडून त्र्यंबक सीताराम कारखानीस यांच्यासारखा ताकदवान उमेदवार असताना कदम यांनी नेटाने काम केले. शिरोळपासून वैभववाडी असा विस्तीर्ण प्रदेश असलेल्या मतदारसंघात प्रचार करणे प्रचंड कष्टाचे काम होते.
त्यात पक्षाचे चिन्ह लोकांपर्यंत गेले, तरच मतदान अवलंबून होते. कदम यांनी इचलकरंजीतील संपर्क आणखी घट्ट करत वैभववाडीपर्यंत नव्या माणसांपर्यंत पोहचण्याचे काम केले. त्यांचे प्रयत्न, काँग्रेसची ताकद व नेत्यांची साथ यावर त्यांनी दोन लाख २७ हजार ३६३ मते घेत विजय मिळवला. कारखानीस यांना एक लाख ४२ हजार ३७२ मते मिळाली. अपक्ष उमेदवार आ. ह. चिगरे यांना फारच कमी मते मिळाली.
काँग्रेस कमिटीची इमारत कदम यांच्या कालावधीत उभी राहिली. प्रथम सहकारात काम करणाऱ्या या नेत्याने पक्षाच्या माध्यमातून अनेक कामांना सुरुवात केली.
त्यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे १९७७ च्या निवडणुकीत त्यांच्या नावाची चर्चा असताना पक्षातील यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या वादात पडण्यापेक्षा कदम यांनी उमेदवारी नाकारली. त्यांच्या कारकिर्दीचा दाखला अजूनही या मतदारसंघात दिला जात आहे.
इचलकरंजी मतदारसंघ
एकूण मतदार - ९, ७१, ४७३
एकूण पुरुष मतदार- ४, ९५, २४५
एकूण स्त्री मतदार - ४, ७६, २२८
एकूण मतदान - ५,१८, ५११
एकूण पुरुष मतदान- २, ९१, ३१९
एकूण स्त्री मतदान - २, २७, १९२
एकूण मतदार - ९, ०५, ०९१
एकूण पुरुष मतदार - ४, ५७, ६६२
एकूण स्त्री मतदार - ४, ४७, ४२९
एकूण मतदान- ४, २४, ७४२
एकूण पुरुष मतदान - २, ४५, ९२१
एकूण स्त्री मतदान- १, ७८, ८२१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.