The stress on the staff at Panchganga cemetery will be lightened; Read detailed 
कोल्हापूर

पंचगंगा स्मशानभूमीतील  कर्मचाऱ्यांचा ताण होणार हलका ; वाचा सविस्तर 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीवरील वाढता ताण पाहता आणखी 15 कर्मचारी देण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. कोविडच्या संकटामुळे दररोज 45 ते 50 इतक्‍या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होतात. केवळ 15 कर्मचाऱ्यांच्या जोरावर रात्रंदिवस अंत्यसंस्काराचे काम सुरू आहे. त्यांना उसंत मिळावी, यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सेवा देण्याची तयारी दाखविली आहे, 
चार महिन्यांपासून अडीच हजाराहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. कोविडने मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातील एखाद्याचा शहरात कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्यावरही पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. 
दोन महिन्यापासून चार शिफ्टमध्ये कर्मचारी जीव धोक्‍यातून घालून काम करत आहेत. पीपीई किट घालून खबरदारी घेतली जात असली तर कर्मचारी अंत्यसंस्कार करून थकून गेले आहेत. एक मतृदेह जातो, तोपर्यत दुसरा हजर अशी स्थिती सध्या आहे. एखाद्याला कोरोनाची लागण झाली म्हटले तरी लोक त्याच्या घरच्या मंडळींना स्वीकारायला तयार होत नाहीत. अशा स्थितीत स्मशानभूमीतील कर्मचारी कोरोनाग्रस्त मृतांवर अंत्यसंस्कार करतात. महापालिकेच्या विविध विभागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. 30 अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. कोविडचे संकट काही कमी होण्याची चिन्हे नाहीत. मृतदेहांचा आकडा वाढत जाणार आहे. कोविड मृतदेहाबाबत खबरदारी घेतली जात असली तरी कधी कोणता धोका निर्माण होईल याचा नेम नाही. त्यामुळे मनुष्यबळात वाढ करावी असा प्रस्ताव दिला गेला होता. 


अंत्यसंस्काराचे काम जोखमीचे आहे. त्यात कोविडच्या काळात काम करण्यास कोणी तयार होत नाही. अशा स्थितीत जे कर्मचारी निवृत्त झाले आहेत त्यांना ऑफर दिली. त्यांनी धाडस दाखवून कामाची तयारी केली आहे. दोन दिवसात पंधरा कर्मचारी उपल्बध होतील. 
- अरविंद कांबळे, आरोग्य निरीक्षक, महापालिका  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Attack Israel : इराणचा इस्त्रायलमधील मराठी भाषिक शहरावर हल्ला, १०० अधिक लोक जखमी झाल्याचा दावा

खरात कोठडीत बसून सांगतोय पोलिसांचं भविष्य; पुणे,मुंबईतील भागिदारांचीही SIT चौकशी होणार, अनेकजण आयकरच्या रडारवर

Latest Marathi News Live Update : भोंदूबाबा अशोक खरातची आज पुन्हा SIT चौकशी होण्याची शक्यता

‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 3 दिवसांत 300 कोटींचा टप्पा पार

Maharashtra Kesari: अंतिम फेरीत जय पाटील - हर्षवर्धन सदगीर, तर महेंद्र गायकवाड - सिकंदर शेख झुंजणार; मोहोळ, राक्षे, कोतकर यांचा पराभव

SCROLL FOR NEXT