strict action against doctors if they leave headquarters decision kolhapur zp 
कोल्हापूर

...अन्यथा डॉक्‍टरांवर होणार कडक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच जिल्ह्यात महापुराचीही शक्‍यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या सर्व डॉक्‍टरांनी मुख्यालयातच रहावे. जे डॉक्‍टर मुख्यालयात राहणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा इशारा आरोग्य समितीने दिला आहे. सभापती हंबीरराव पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी ऑनलाईन बैठक घेण्यात आली. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य समितीची मासिक सभा ऑनलाईन घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्‍त करण्यात आली. संभाव्य पूरपरिस्थितीचाहा कोल्हापूर जिल्ह्याला धोका आहे. त्यामुळे सर्व डॉक्‍टर्सनी मुख्यालयीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात साथ रोगाचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे एकत्रित संकटामुळे जिल्हा प्रशासन हैराण झाले आहे. म्हणूनच डॉक्‍टरना हे आदेश देण्यात आले आहेत.

पावसाळ्यामध्ये आरोग्य यंत्रणेची कसोटी लागते. अनेक गावांचे मार्ग बंद होतात. त्यामुळे आरोग्याची व्यवस्था तत्पर राहणे आवश्‍यक आहे. तसेच वैद्यकीय सुविधा देत असताना औषधांचा पुरवठाही सुरळीत राहील, साथरोगाची औषधे पुरेशी आहेत का, याचीही खातरजमा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

Live Updates Marathi: पेपरफुटीच्या मुद्द्यावर सभागृहातच चर्चा आवश्यक- जेपी नड्डा

FDA Crime : अस्वच्छतेमुळे १० हॉटेल, बेकरींचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT