Strong response to Kolhapur-Ahmedabad flight on the first day
Strong response to Kolhapur-Ahmedabad flight on the first day 
कोल्हापूर

कोल्हापूर-अहमदाबाद विमान सेवेला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाद

महादेव वाघमोडे
उजळाईवाडी, कोल्हापूर ः बहुचर्चित कोल्हापूर ते अहमदाबाद विमान सेवेचा आज प्रारंभ झाला. पहिलाच विमानांमधून 59 प्रवासी कोल्हापूरला आले. त्यांचे स्वागत शॉवर सलामीने झाले. पहिल्या फेरीतील प्रवाशांपैकी इंदुमती चंद्रकांत यांच्या हस्ते केक कापण्यात आला. इंडिगो कंपनीचा ध्वज दाखवून ही सेवा सुरू झाल्याचे खासदार संजय मंडलीक यांनी जाहीर केले. परतीच्या विमानातून कोल्हापूरहून अहमदाबादला 54 प्रवाशी रवाना झाले. सकाळी 11 वाजून 11मिनिटांनी विमान लॅण्डींग झाले तर 11 वाजून 35 मिनिटांनी अहमदाबादसाठी टेक ऑफ केले. इंडिगो एअरलाईन्सच्या कोल्हापूर अहमदाबाद विमान सेवेमुळे कोल्हापूर, इचलकरंजी, कराड व सातारा येथील व्यापारी व उद्योजकांनी समाधान व्यक्त केले. पहिल्याच दिवशी मिळालेला प्रतिसाद पाहता विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू करण्याचे सूतोवाच विमानतळ प्रशासनाने केले आहे. कोल्हापूर विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले. आमदार ऋतुराज पाटील यांनीअहमदाबाद विमानसेवा सुरू झाल्याचा आनंद असून विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. विमानतळ अधिकाऱ्यांनी विकासकामांना अधिकाधिक गतीमान करण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत आमदार चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केले. विमानतळाच्या विमानतळ संचालक कमल कुमार कटारिया यांनी आभार मानले. यावेळी अहमदाबादसाठी प्रथम प्रवासी म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री एग्रीकल्चरचे ललीत गांधी यांनी प्रवास केला. यावेळी ऍड. सुरेश कुराडे, विजय अग्रवाल, विज्ञान मुंडे, अमर गांधी, अमित हुक्केरी, विजय घाडगे, विजय अग्रवाल विक्रांतसिंह कदम, इंडिगो एअरलाइन्सचे एअरपोर्ट मॅनेजर विशाल भार्गव उपस्थित होते.  विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. तिरुपती विमान सेवा सुरू कोल्हापूर विमानतळावरून कोरोना संसर्गामुळे खंडित झालेली तिरुपती मार्गावरील विमानसेवा आजपासून सुरू झाली. तिरुपतीहून आलेल्या विमानाने पाच वाजून दहा मिनिटांनी कोल्हापुरात लॅंडिंग केले तर 5 वाजून 30 मिनिटांनी तिरुपतीसाठी टेक ऑफ केले. तिरुपती वरून 68 प्रवासी कोल्हापूरला आले तर कोल्हापूरहून 22 प्रवाशी रवाना झाले. नाईट लॅण्डींगबाबत 27 ला बैठक ः खासदार संभाजीराजे संभाजीराजे छत्रपती हे परगावी असल्यामुळे त्यांनी ट्टीट करून समाधान व्यक्त केले. तसेच नाईट लॅण्डींग अद्याप अपूर्ण असून त्यासाठी 27 फेब्रुवारीला दिल्लीत बैठक होत असल्याचेही त्यांनी ट्टीट मध्ये म्हटले आहे. लवकरच नाईट लॅणंडीगसह कार्गोहब, फ्लाईंग क्‍लब आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवा कोल्हापुरात सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ट्‌वीटमध्ये म्हटले आहे, की आजपासून कोल्हापूर ते अहमदाबाद विमान सेवेला सुरुवात झाली. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या पाठपुराव्याला यश आले. कोल्हापूर विमानतळ विकासासाठी 275 कोटींचा प्रस्ताव मंजूर केल्यामुळेच तिरुपती, बंगळूर, हैदराबाद तसेच मुंबई नंतर आता अहमदाबादही हवाई मार्गाने कोल्हापूरशी जोडले गेले. भारतीय विमान प्राधिकरणाचे महासंचालक आणि ऑपरेशन प्रमुख यांच्याशी नाईट लॅंडिंग बाबत चर्चा झाली असून, केंद्राकडून नाईट लॅंडिंगसाठी प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे . मात्र राज्य शासनाकडून काही बाबींची पूर्तता होणे अद्याप बाकी असल्याने यासाठी 27 फेब्रुवारी रोजी महत्त्वाची बैठक घेण्यात येणार आहे. संपादन - यशवंत केसरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT