कोल्हापूर

कोरोनाच्या लढ्यात वस्त्रोद्योगाची भक्कम साथ

प्रतिनिधी

कोल्हापूर ः कोरोना विरूध्दच्या लढ्यात भारतातील वस्त्रोद्योग क्षेत्राने भक्कम साथ दिली. 1 मार्च रोजी एकही पीपीई कीट न बनणाऱ्या देशात आज रोज दोन लाख पीपीई कीट तयार होत आहेत. ही बाब गौरवपूर्ण असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग व महिला, बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी केले. 
वेबिनारच्या माध्यमातून त्यांनी वस्त्रोद्योग व्यावसायिकांशी संवाद साधला. "कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' यांच्यावतीने व वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज, ऍग्रो ऍण्ड एज्युकेशन (वेसमॅक) यांच्या संयुक्त सहकार्याने वेबिनार आयोजीत करण्यात आले होते. कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी स्वागत केले. महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी प्रास्ताविकात वस्त्रोद्योग क्षेत्राच्या अडचणी विषद केल्या. 
कॉन्फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व वेसमॅकचे अध्यक्ष ललित गांधी यांनी देशातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील संस्थांनी मांडलेल्या मुद्यांची एकत्रित टीप्पणी सादर केली. ज्यामध्ये लॉकडाऊन काळातील वेतन, टफ स्कीममधील अडचणी, बॅंक कर्जावरील व्याजदर, चीनमधुन होणाऱ्या आयातीस प्रतिबंध आदी मुद्दयांचा समावेश होता. 
मंत्री स्मृति इराणी यांनी वस्त्रोद्योग क्षेत्राच्या अन्य मंत्रालयाकडील अपेक्षा विशेषतः अर्थमंत्रालय व वाणिज्य मंत्रालयांशी संबंधित विषय त्या त्या विभागाकडे पाठविले असून पॅकेजची घोषणा होईल, त्यावेळी सर्व क्षेत्रांना योग्य न्याय मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला. वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून नवीन पीपीई कीट च्या प्रयोगशाळा चाचण्या, उत्पादन परवानगी आदी बाबी तात्काळ निकालात काढू असे जाहीर केले. सध्या देशात 200 पीपीई कीट उत्पादन करणारे कारखाने कार्यरत असुन त्यांना सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य केले जात आहे. तसेच नवीन 400 कंपन्यांनी उत्पादनाची परवानगी मागितली असुन त्यापैकी 200 परवानग्या दिल्या आहेत. राष्ट्रीय संगठन मंत्री धैर्यशील पाटील यांच्यासह देशभरातील 425 हुन अधिक विविध संस्था प्रतिनिधिंनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT