student waiting for new academic year 
कोल्हापूर

नवीन शैक्षणिक वर्ष नक्की कधी ?

राजेंद्र हजारे

निपाणी (बेळगाव) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. शैक्षणिक वर्ष संपून उन्हाळी सुट्टी लागली आहे. तरीही विद्यार्थ्यावर शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षणाचा मारा सुरू आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्ष नेमके केव्हा संपणार व नवीन वर्ष कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा विद्यार्थी व पालकांना लागून राहिली आहे.

यंदा अनेक वर्गांच्या परीक्षा रद्द करून शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे. तर दहावीच्या वार्षिक परीक्षा प्रलंबितच आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अभ्यासक्रमाद्वारे उत्तरपत्रिका सोडविण्याचा सराव करून घेतला जात आहे. मे महिना निम्म्यावर आला असून अद्यापही लॉकडाउन उठण्याच्या तयारीत नाही. त्यामुळे जूनमध्ये परीक्षा झाल्यास निकालानंतर महाविद्यालयीन शैक्षणिक सत्र कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वजण द्विधा मन:स्थितीत

प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षणाची नवीन पद्धत सुरू केली आहे. त्यामध्ये विषय शिक्षक पालकांच्या अँड्रॉइड मोबाईलवर अभ्यासक्रम देत आहेत. अँड्रॉइड मोबाईल नसल्यास शेजारील मित्राकडून अभ्यास जाणून घेण्याची सूचनाही शिक्षण विभागाने केली आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाबाबत पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये द्विधा मन:स्थिती आहे.
 

'शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सध्या ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरू करण्यात आली आहे. तसेच सध्या लॉकडाउन असल्याने प्रशासनाच्या निर्णयानंतरच पुढील नियोजन होण्याची शक्यता आहे.'
- रेवती मठद,
गटशिक्षणाधिकारी, निपाणी
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT