students get food in holiday at karnataka 
कोल्हापूर

शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना मिळणार माध्यान्ह आहार 

मिलिंद देसाई

बेळगाव : शाळा बंद असल्या तरी एप्रिल व मे महिन्यातील 37 दिवसांचा माध्यान्ह आहार वितरीत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार सर्व सरकारी व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून सामाजिक अंतर राखत धान्य वाटप करण्याची सूचना सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे. 


कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरी आहेत. त्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा यासाठी माध्यान्ह आहाराचे वितरण करण्याची सूचना करण्यात आली आहे. सध्या फक्‍त एप्रिल व मे महिन्यातील धान्याचे वाटप केले जाणार आहे. तर त्यानंतर जुन व जुलै महिन्यातील धान्याचे वाटप केले जाणार आहे. तसेच धान्य वाटप करीत असताना शाळेत गर्दी होऊ नये यासाठी एकाचवेळी पालकांना शाळेत न बोलविता सामाजिक अंतर राखण्यासाठी दररोज कमी प्रमाणात पालकांना बोलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

ज्या शाळांना एनजीओमार्फत माध्यान्ह आहाराचे वितरण करण्यात येते, त्या शाळांना एनजीओमार्फत धान्य पुरविण्यात येणार आहे. तर ज्या शाळांमध्ये स्वयपांक तयार केला जातो त्या शाळांनाही धान्याचा पुरवठा करण्यात आला आहे. 


 पहिली ते पाचवी 
तांदुळ - 3 किलो 
गहु - 700 ग्रॅम 
तुरडाळ - 2 किलो 250 ग्रॅम 


सहावी ते दहावी 
तांदुळ - 4 किलो 450 ग्रॅम 
गहू - 1 किलो 50 ग्रॅम 
तुरडाळ - 3 किलो 500 ग्रॅम 

सध्या फक्‍त एप्रिल व मे महिन्यातील धान्य वितरीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, सर्व शाळांना माहिती देण्यात आली असून पालकांना बोलावून धान्य वाटप केले जाणार आहे. जुन व जुलै महिन्यातील धान्य वाटपाचा अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

-बसवराज मिलानट्टी, शिक्षणाधिकारी अक्षर दासोह योजना
 


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : गॅससाठी नागरिकांच्या रांगाच रांगा

SCROLL FOR NEXT