Students have no money, only free uniforms 
कोल्हापूर

विद्यार्थ्यांच्या हातात पैसे नाहीत, थेट मोफत गणवेशच 

संदीप खांडेकर

कोल्हापूर : शाळेचे दरवाजे कधी उघडायचे ते उघडू देत. महापालिकेच्या 59 शाळांतील 6 हजार 528 विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचा लाभ मात्र मिळणार आहे. प्रती गणवेशासाठी तीनशे रूपयांप्रमाणे 39 लाख 17 हजार रूपयांची तरतूद केली आहे. सप्टेंबरमध्ये किंवा तत्पूर्वीच गणवेश विद्यार्थ्यांच्या हाती देण्याची महापालिका प्रशासनाची आहे. यंदाही थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा न करता शाळा व्यवस्थापन समितीकडून गणवेश दिले जाणार आहेत. 

कोरोनाच्या संकटामुळे शाळांची घंटा वाजण्याची तारीख "जर तर'च्या अंदाजात आजही अडकली आहे. शासनाने आदेशात स्पष्टता न ठेवल्याने तशी स्थिती उद्‌भवली आहे. शाळांकडे विद्यार्थ्यांच्या नजरा लागल्या असून, गणवेश मिळणार का?, अशी विचारणाही त्यांच्याकडून होऊ लागली आहे. समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिंक कार्य योजना व अंदाज पत्रकात भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळाने 18 जून 2020 ला गणवेशासाठीच्या तरतुदीस मान्यता दिली आहे. त्यानुसार महापालिका शाळांतील पहिली ते आठवीमधील सर्व मुली, अनुसूचित जाती व जमातीची मुले व दारिद्रय रेषेखालील पालकांच्या मुलांना गणवेश देण्यात येतात. यात प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेशासाठी प्रत्येकी 600 रूपये दिले जातात. यावर्षीही दोन गणवेश दिले जाणार आहेत. 

याविषयी कार्यकारी अधिकारी रसूल पाटील म्हणाले,""गणवेश योजनेला थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रक्रियेतून कायम स्वरूपी वगळले आहे. मंजूर निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर लाभार्थ्यांच्या संख्येनुसार दिला जाणार आहे. व्यवस्थापन समितीच्या स्तरावरून गणवेश पुरवठा करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात येतील.'' 

रंग, प्रकार ठरवून पुरवठा... 
गणवेशाचा रंग, प्रकार ठरवून गणवेश पुरवठा करण्याचा संपूर्ण अधिकार संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी दिली. 

दृष्टिक्षेप 
- महापालिकेच्या 59 शाळांमधून मोफत वाटप 
- 6 हजार 528 विद्यार्थ्यांना मिळणार लाभ 
- प्रती गणवेश तीनशे रूपयाप्रमाणे 39 लाख 17 हजाराची तरतूद 
- प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश मिळणार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT