Sub Treasury Officer arrested taking bribe kolhapur crime news 
कोल्हापूर

कोल्हापूर ; कागलचा उपकोषागार अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

नरेंद्र बोते

कागल : उपकोषागार कार्यालयात सादर केलेली स्थानिक औषध खरेदीची बिले मंजूर करण्यासाठी दोन हजाराची लाच घेताना उपकोषागार अधिकारी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकला. मिलिंद मधुकर कुलकर्णी (वय 55, उपकोषागार अधिकारी,  वर्ग - २, रा. प्लॉट नं. 69, अरुणोदय को.ऑप. सोसायटी, शाहू पार्क, राजेंद्र नगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी, मुरगूड ( ता. कागल ) च्या ग्रामीण रुग्णालय येथील स्थानिक औषध खरेदीची बिले या कार्यालयात मंजूरीसाठी पाठविली होती. ती बिले मंजूर करण्यासाठी कुलकर्णी याने लाच मागितली होती. 

आज सापळा रचून लाच घेताना त्यास रंगेहात पकडण्यात आले. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौंडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, सहाय्यक फौजदार संजीव बंबरगेकर, पोलिस नाईक कृष्णात पाटील, पोलिस कॉन्स्टेबल संदीप पडवळ, मयूर देसाई,  रुपेश माने, चालक पोलिस हेड कॉन्स्टेबल विष्णू गुरव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT