success story farmer dilip kamble Pearl farming sadoli dumala kolhapur 
कोल्हापूर

Success Story : कमीतकमी गुंतवणूक करून युवा शेतकऱ्याने केली मोत्यांची शेती

संभाजी निकम

शिरोली दुमाला (कोल्हापूर)  : कोरोना महामारीत सततच्या लॉकडाउनमुळे व्यवसाय आणि अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आले असताना मंदीतही हार न मानता मोत्यांची शेती करून युवकांसमोर आदर्श निर्माण केला आहे, सडोली दुमाला (ता. करवीर) येथील दिलीप कांबळे या युवा शेतकऱ्याने. घरातच मोत्यांची शेती करून व्यवसायाची अनोखी वाट धुंडाळली आहे.


मोत्यांची शेती नेमकी कशी असते, हे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘मोत्यांच्या शेतीसाठी मोठी जमीन लागत नाही. नदीतून शिंपले आणल्यानंतर त्यांच्यावर लहानशी न्यूक्‍लिअस शस्त्रक्रिया केली जाते. त्यापैकी काही शिंपले मरण पावतात, तर काही त्या बिजांना स्वीकारतात. तशा शिंपल्यांना काढून मोठ्या टॅंकमध्ये ठेवले जाते. त्यानंतर पाण्यात शिंपल्यांसाठी खाद्य टाकणे, पाण्याचे तापमान ठरावीक पातळीवर मर्यादित ठेवणे, मृत शिंपले दूर करणे, अशी काळजी घ्यावी लागते. मोती बनण्याचा कालखंड आठ ते दहा महिन्यांचा असतो. 


काही शिंपल्यांत साचे टाकून हव्या त्या आकाराचे, विविध डिझाइनचे मोती बनवता येतात. तयार झालेले मोती शंभर रुपयांपासून साडेतीनशे रुपयांपर्यंत विकले जातात. आतापर्यंत महापुरुषांच्या व देवतांच्या प्रतिमा असलेले विविध आकाराचे मोती बनवले आहेत.’’

दरम्यान, सुरवातीला त्यांनी काही शिंपल्यांचे संगोपन केले; पण त्यांना अपयश आले. यानंतर त्यांनी ओडिशामधील शिपा या ठिकाणी प्रशिक्षण घेतले. यात त्यांनी २५ ते ३० हजारांची गुंतवणूक केली असून, दहा हजार शिंपल्यांचे संगोपन केले आहे. यातून त्यांना चार ते पाच लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. दिल्ली, ओडिशा या ठिकाणी ते विक्री करतात. बेरोजगारांनी अशाप्रकारे व्यवसाय करावा, यासाठी त्यांचा प्रयत्न असून ते स्वतः याचे मोफत प्रशिक्षण देतात.

कमीतकमी गुंतवणूक करून मोत्यांची शेती करता येते. सुरवातीला यात थोडे नुकसान झाले; पण चिकाटी सोडली नाही. यातील तज्ज्ञ लोकांकडून याचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळे आम्हाला यातून चांगला नफा मिळत आहे.
- दिलीप कांबळे, सडोली दुमाला, करवीर.


संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unhealthy Ration : गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ; सुधागडात रास्तभाव दुकानातील धान्यात चक्क जिवंत अळ्या व लेंड्या!

Pune News : मुलासह दोन महिन्यांत सासरी परतण्याचे पत्नीला न्यायालयाचे आदेश; पतीचा अर्ज मंजूर

Maharashtra Politics : सोलापुर जिल्ह्यातील भाजप उमेदवाराचे एबी फॉर्म शशिकांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्त!

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

Pune News : भाजपने कंबर कसली! मोहोळ, बीडकर, लांडगे, कुल आणि जगताप यांच्याकडे दिली महत्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT