success story for ichalkaranji Biryani business
success story for ichalkaranji Biryani business 
कोल्हापूर

इचलकरंजीतील नाझियाच्या बिर्याणीला नाही तोडच ; कष्टाने आणली चव

धनाजी सुर्वे

कोल्हापूर - कष्टाच्या घामालाही एक चव असते असे म्हणतात. अशीच चव आहे इचलकरंजी येथील नाझिया समिर मनेर यांच्या बिर्याणीला. उपजीविकेचे आणि उत्पन्नाचे साधन म्हणून पाच वर्षापूर्वी छोट्याशा गाड्यावर सुरू केलेल्या बिर्याणीचा व्यवसाय आज एका कुटुंबाचा आधार बनलाय. नाझिया यांची बीर्यानी इचलकरंजीत एवढी प्रसिध्द आहे की, चुकून कधीतरी त्यांची गाडी बंद असेल कर खवय्ये त्या दिवशी बिर्याणी खाण्याचा मोह आवरतात आणि दुसऱ्या दिसशी नाझिया यांच्याकडेच येवून चवदार बिर्याणीवर ताव मारतात. 

कुटुंबीयांच्या साथिने नाझिया यांनी सुरू केला हा व्यवसाय अतिशय कष्टाने, खऱ्या अर्थी घाम गाळून करीत आहेत.

इचलकरंजीतील जनता बंकेजवळील गुरू टाॅकिज येथे लखनऊ बिर्याणी नावाने नाझिया यांची बिर्याणीची व्हॅन उभी असते. छोट्याशा गाड्यावर सुरू केलेला त्यांचा हा व्यवसाय आज एका व्हनपर्यंत पोहोचला आहे. त्यासाठी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून आयसीआयसीआय बॅंकेकडून कर्ज घेतले. आपल्या हाताच्या चवीने अनेक खव्वयांची खाण्याची हौस पूरविण्याचे काम त्या करतात. कुटुंबाचा गाडा सांभाळत-सांभाळत नाझिया यांचा हा व्यवसाय सुरू आहे. 

नोकरीपेक्षा व्यवसाय बरा

याबाबत नाझिया यांच्याशी संवाद साधला असता त्या सांगतात,  लग्नानंतर नोकरी करण्याचा विचार डोक्यात होता. काही मैत्रीणी नोकरीकडे वळल्याही परंतु, एखादा व्यसाय केला तर कुटुंबाकडेही लक्ष राहिल आणि चार पैसेही मिळतील असा विचार केला. याच विचारातून काही तरी करायचे ठरविले. स्वयंपाक चांगल्याप्रकारे करता येत असल्याने यातूनच काही तरी करावे असा विचार सुरू झाला. त्यातूनच बिर्याणी व्यवसाय करायचे ठरले. घरातूनही चांगली साथ मिळाली. सासु, जावा आणि पतीच्या मदतीने एका छोट्याशा गाड्यावर हा व्यवसाय सुरू केला. चांगला जम बसल्यानंतर व्हॅन खरेदी केली आणि आता त्यावरच बिर्य़ाणी करत आहे. इचलकरंजीत माझ्यासारखेच अनेक बिर्याणीचे गाडे आहेत. परंतु, माझ्या हातची बिर्याणी खाण्यासाठी लोक ठरवून येतात. एकाद्या दिवशी काही कारणाने गाडी बंद असेल तर लोक त्या दिवशी बिर्याणी खात नाहीत. ते दुसऱ्या दिवशी परत माझ्याकडेच बिर्य़ाणीसाठी येतात. माझ्या हातची चव आता संपूर्ण इचलकरंचीकरांच्या आवडीची झाली आहे. 

कष्टाची जोड

सायंकाळी पाच वाजता नाझिया गाडी सुरू करतात. गाडी सुरू केल्यानंतर काही वेळातच परिसरात बिर्याणीचा घमघमाट पसरतो अन् लोकांची पावले आपसूकच गाडीकडे वळतात. रोज चार ते पाच तास हेच चित्र सुरू असते. परंतु, याच घमघमाटासाठी सकाळी उठल्यापासून नाझिया यांचे हात राबत असतात. चिकन, मसाला, रस्सा याची तयारी सकाळपासूनच तयारी सुरू असते. संपूर्ण दिवसभर हे नियोजन झाल्यानंतरच सायंकाळी पाच वाजता गाडीवर खव्वयांची मने तृप्त होतात. कष्ट, मेहनत करून मिळालेले काम करत राहणे, एवढेच चक्र सुरू असलेला हा व्यवसाय म्हणजे नाझिया यांची लखनऊ बिर्याणी. 

प्रसिद्धीपासून दूर असलेला हा व्यवसाय तुफान जोशात सुरू आहे. नाझिया यांची अथक धडपड आणि त्यांना साथ देणाऱ्या कुटुंबीयांच्या बळावरच! जे दर्जेदार आहे, चविष्ट आहे, त्याची जाहिरात करावी लागत नाही की ‘आमचा माल घ्या’ म्हणून दारोदार भटकंतीही करावी लागत नाही. हेच नाझिया यांच्या व्यवसायाचे वैशिष्ट्य आहे. सामान्य कुटुंबांतील नाझिया आपल्या छोट्याशा व्हनमध्ये अतिशय कष्टाने, खऱ्या अर्थी घाम गाळून हा व्यवसाय करीत आहेत. एकेकाच्या हाताला चव असते. नाझिया यांच्या हातून तयार होत असलेल्या बिर्याणीचेही तेच झाले. एकादा का व्हॅन येवून उभी राहिली की गिऱ्हाईकांची वाट पाहावी लागत नाही. 

 कष्ट, मेहनत, प्रामाणिकपणा आणि चवीमुळे नाझिया यांचा बिर्यानी व्यवसाय तेजीत आहे. आज नाझिया यांच्या या उद्योगामुळे एका हाताला रोजगारही मिळाला आहे. रोज सात ते आठ किलोची बिर्याणी विकली जाते. सामान्य परिस्थितीतील उद्योजक आणि सामान्य कुटुंबांतील नाझिया यांनी चालविलेला हा बिर्यानी व्यवसाय आज चांगल्या प्रकारे सुरू आहे.

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT