Such Is The Ideal Of Laxmipuri Police Line Kolhapur Marathi news 
कोल्हापूर

लक्ष्मीपुरी पोलिस लाईनचा असाही आदर्श

राजेश मोरे

कोल्हापूर ः घरची मंडळी पोलिस दलात अहोरात्र कर्तव्य बाजवत आहेत. कोरोनाचा संसर्गाचे धोके जाणून लॉकडाऊन लागू केला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी "आम्ही घरातून बाहेर पडणारच नाही' असा आदर्श लक्ष्मीपुरी पोलिस लाईनमधील पोलिस कुटुंबीयांनी घालून दिला आहे.

 कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. गेल्या महिन्याभरापासून पोलिस अहोरात्र बंदोबस्त बजावत आहेत. विनाकरण घराबाहेर पडू नका, गर्दी करू नका असे आवाहन पोलिसांकडून केले जाते. अत्यावश्‍यक सेवेसह नागरिकांच्या अडचणी सोडविल्या जात आहेत. कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी पोलिस मुख्यालय, बुधवार पेठ, लक्ष्मीपुरी पोलिस लाईन येथे कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत.

लक्ष्मीपुरी पोलिस लाईन येथे सुमारे 83 कुटुंबे वास्तव्यास आहेत. प्रत्येक घरातील निदान एक जण पोलिस खात्यात कर्तव्य बजावत आहे. कोरोनाची लढाई जिंकायची असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडूनही मोलाची साथ मिळत आहे. हे त्यांचे कुटुंबीयही पोलिस दलाकडून दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत आहेत. लॉकडाऊन काळात आम्ही घराबाहेर पडणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. त्यामुळे पोलिस लाईनमध्ये दिवसाही रात्रीसारखी शांतता पहावयास मिळत आहे. त्यांनी घालून दिलेल्या या आदर्शाचे अनुकरण सर्वांनी केल्यास कोरोना हद्‌पार व्हायला वेळ लागणार नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT