Ajit Pawar esakal
कोल्हापूर

Ajit Pawar : 'साखर कारखान्यांनी कर्ज काढून उसाला FRP पेक्षा जादा दर देऊ नये; काय म्हणाले अजितदादा?

Ajit Pawar : केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी साखर कारखान्यांवरील इन्कम टॅक्सची टांगती तलवार दूर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

''साखर कारखान्यांकडून घेतला जाणारा कर रद्द व्हावा, यासाठी वीस वर्षांपासून आम्ही लढा दिला. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा केला.''

कोल्हापूर : ‘साखर कारखान्यांनी (Sugar Factory) आर्थिक शिस्त पाळावी. कर्ज काढून उसाला एफआरपीपेक्षा जादा दर देऊ नये’, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. जिल्हा बँकेच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

दरम्यान, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी साखर कारखान्यांवरील इन्कम टॅक्सची टांगती तलवार दूर केली आहे. एफआरपीपेक्षा जादा दिलेला दर इन्कम टॅक्समधून कमी करावा, अशी मागणी शहा यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पवार म्हणाले, ‘प्रत्येक कारखान्याला एफआरपी (FRP) देणे बंधनकारक आहे. एफआरपी देताना नाकीनऊ आलेल्या कारखान्यांच्या मानगुटीवर इन्कम टॅक्सची टांगती तलवार होती. हा प्रश्‍न राज्यासह देशातील सर्वच साखर कारखान्यांना भेडसावत होता. याबाबत साखर कारखान्यांकडून घेतला जाणारा कर रद्द व्हावा, यासाठी वीस वर्षांपासून आम्ही लढा दिला. तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे पाठपुरावा केला.

चर्चेतून हा कर भरण्यास मुदतवाढ मिळत होती. मात्र त्याची टांगती तलवार आमच्या डोक्यावर असायची. हाच विषय केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी कारखान्यांच्या डोक्यावर असणारी टांगती तलवार काढून टाकली आहे. त्यामुळे आता कारखान्यांना नोटीस येत नाहीत.’

‘आचारसंहिता दोन दिवसांत’

‘विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता दोन-तीन दिवसांत लागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता आहे,’ अशी माहितीही पवार यांनी या कार्यक्रमात दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेसाठी गोपीचंद पडळकर मैदानात, जयंत पाटलांविरोधात फुकले रणशिंग

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT