sugarcane workers story by sadashiv pukale sangli 
कोल्हापूर

पोटाची खळगी भरायची का? शिकवायचं

सदाशिव पुकळे

झरे (कोल्हापूर) : येथील परिसरात ऊसतोड सुरू आहे. टेंभूचे पाणी आल्याने परिसरामध्ये उसाच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तोडणीसाठी जळगाव जिल्ह्यातून कामगार ऊसतोड मजूर आले आहेत. मजूरांबरोबर संपूर्ण कुटूंब आहे. यातील मुलांना शिक्षण मिळणं कठीण होऊ लागले आहे. पोटाची खळगी भरण्याच्या नादात मुले शिक्षणापासून दूर जात आहेत.


मुले शिकली नाहीत तर भविष्यामध्ये त्यांना शिक्षण कसे मिळणार हा गंभीर प्रश्न आहे. एकीकडे शासनाकडून कोणताही मुलगा, मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  तर दुसरीकडे  बेरोजगारी वाढत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी ऊस तोड कामगार असो किंवा अन्य कामगार असो स्थलांतर करावे लागते. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा अडचणीचा भाग झाला आहे.


याबाबत एक मजूर म्हणतो, आम्हाला तिकडे जमिन, जागा काही नाही. त्यामुळे चार ते पाच महिने ऊसतोड करायची आणि त्यातून जे पैसे येतील ते पुढील वर्षभर टिकून ठेवून त्यावर पोट भरायचे व गावाकडे मिळेल ते काम करायचे, तरीही पोट भागत नाही. मग मुलांना शिक्षण कसे द्यायचे?.  ऊस तोड कामगार असो किंवा स्थलांतरित मजूर असो त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने मदत करायला पाहिजे तरच स्थलांतर कामगारांची मुले शिक्षण घेऊ शकतील. अन्यथा शिक्षणापासून वंचित राहतील.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

SCROLL FOR NEXT