Suggestion to set up village level committee for Gram Panchayat elections 
कोल्हापूर

ग्राम पंचायत निवडणुकींसाठी कमिटी स्थापनेचे आदेश

मिलिंद देसाई

बेळगाव : ग्राम पंचायत निवडणुकीसाठी गाव पातळीवर कमिटी स्थापन करण्याची सुचना तालुका महाराष्ट्र एकिकरण समितीतर्फे करण्यात आली होती. त्यानुसार तालुक्‍यातील विविध गावांमध्ये निवडणुकीत उमेदवार निवडीसह विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी कमिटी स्थापन करण्यास सुरुवात झाली आहे. 


ग्राम पंचायत निवडणुक जाहीर झाल्यापासुन समितीतर्फे जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. शनिवारी झालेल्या तालुका समितीच्या बैठकीत निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना विविध प्रकारच्या सुचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार कार्यकर्ते कामाला लागले असुन कमिटीकडे इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. यावेळी तालुक्‍यातील जास्तीत जास्त पंचायतीवर समितीची सत्ता यावी यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशिल आहेत. त्यामुळेच योग्य रणनिती आखुन निवडणुकीला सामोरे, जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला कार्यकर्त्यांकडुनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


गाव पातळीवर नेमण्यात आलेल्या कमिटीच्या माध्यमातुन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच योग्य उमेदवार देण्यासाठी चाचपणी केली जाणार आहे. तसेच अर्ज भरण्यासाठी वेळ कमी असल्याने अर्ज भरण्यासाठी आवश्‍यक असलेल्या कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनाही वेळेत कागदपत्रे मिळण्यास मदत होणार आहे. तसेच समिती कार्यकर्त्यांनी गट तट विसरुन निवडणुकीला सामोरे जाणे आवश्‍यक आहे.

ग्राम पंचायती अस्तीवात आल्यापासुन बेळगाव तालुक्‍यातील सर्रास ग्राम पंचायतीवर समितीचे वर्चस्व राहीले असुन यावेळी तालुक्‍यातील 40 हुन अधिक पंचायतीवर भगवा फडकविण्याचे उदिष्ठ ठेवण्यात आले आहे. त्यामुळे 22 तारखेला होणारी निवडणुक समितीला बळकट करण्यास मदत करणारी ठरेल असे मत व्यक्‍त होत आहे. 

हेही वाचा- लसीकरणाची तयारी जानेवारी अखेरपर्यंत: प्रत्येकाला दोन वेळा डोस -

येळ्ळुर येथे निवड प्रक्रिया राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याबरोबर अर्ज करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी तिन जणांची निवड करण्यात आली आहे. इतर गावांमध्येही कमिटी स्थापन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे चांगले उमेदवार निवडण्यास मदत होणार आहे. 


एल. आय. पाटील, सरचिटणीस तालुका समिती
 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT