suicide case in criminal in kolhapur kasaba bawada 
कोल्हापूर

स्वत:च्या मुलीला मारलेल्या संशयित आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न..

राजेश मोरे

कोल्हापूर : "आयटीआय' येथील तात्पुरत्या कारागृहाच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेऊन न्यायालयीन बंदीने आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो जखमी झाला. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. तानाजी दिलीप मंगे (वय 29, मूळ रा. उमरगा, उस्मानाबाद) असे त्याचे नाव आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती,

कसबा बावडा येथे 24 जुलैला सहा वर्षाची अनन्या नावाच्या मुलीचा पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला. बापानेच कानशिलात लगावल्याने तिचे डोके भिंतीवर आपटले. त्यात ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. याप्रकरणी संशयित तानाजी दिलीप मंगे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्यावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली होती.

न्यायालिन बंदीचा आत्महत्येचा प्रयत्न

सध्या त्याला 27 जुलै पासून आयटीआय येथील तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. तो कारागृह ठेवल्यापासून तणावात होता. त्याने मंगळवारी सायंकाळी लघुशंकेला जाऊन येण्याचा बहाणा केला. त्याने थेट कारागृहाच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरीतून खाली उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात तो जखमी झाला. त्याला तातडीने प्रशासनाने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत कळंबा कारागृह प्रशासनातर्फे संदीप जयसिंग पाटील यांनी जुना राजवाडा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार त्याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Zilla Parishad : महिलांच्या पुनर्विवाहासाठी पुरुषांचा अभूतपूर्व प्रतिसाद; पण ढिसाळ नियोजनामुळे प्रशासनाची नामुष्की

देवेंद्र फडणवीसांची चतुर खेळी.... Booing होत असताना घेतलं गणपती बाप्पाचं नाव अन्... Video Viral

Viral Video: स्ट्रीट फूडची क्रेझ..! पहिल्यांदाच पाणीपुरी खाल्ली आणि फॉरेनर पर्यटक थेट नाचायला लागली, व्हिडिओ तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update : अमरावती महानगरपालिकेसाठी शरद पवार गट सज्ज प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी घेतला आढावा

Kolhapur crime : बिहारमधील गॅंगवॉरचा थरार कोल्हापुरात उघड; गॅंगस्टरचा खून करून आलेले दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT