Suicide of a ssc student for fear of failure in belgum 
कोल्हापूर

आज दहावीचा पहिलाच पेपर पण तिने भीतीने उचलले 'हे' पाऊल...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - इतके दिवस अभ्यास करून देखील विषय, अभ्यासक्रम लक्षात राहिना, मी परीक्षेला बसले तर नापास होते. अशी भीती मनात बाळगलेल्या दहावीच्या विध्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार (ता.24) रात्री कलमेश्वररोड वडगाव येथे घडली असून सुजाता सुभाष ढगे ( वय 16) असे तिचे नाव आहे. आज गुरुवारी (ता.25) पासून दहावी वार्षिक परीक्षेला सुरुवात झाली असून त्याआधीच केवळ भीतीपोटी विध्यार्थीनीने गळफास घेण्याइतके टोकाचे पाऊल उचलल्याने पालकवर्ग धास्तवला आहे.

लोकडाऊनमूळे राज्यातील दहावी परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलली होती. त्यानंतर आज  गुरुवारी (ता.25) पासून वार्षिक परीक्षेला सुरुवात होणार होती. पण, इतके दिवस अभ्यास करून देखील अभ्यासक्रम लक्षात राहत नाही, परीक्षेला बसले तर मी नापास होते. अशी भीती सुजाताच्या मनात निर्माण झाली होती. त्यामुळे केवळ भीतीपोटी तीने काल रात्री 9 च्या सुमारास घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस येताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयत विद्यार्थीनी सुजाता हिचे वडील विणकर आहेत. ही घटना चिंताजनक असून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT