सायली जाधव  sakal
कोल्हापूर

‘मण्यार’ चा दंश ठरला जीवघेणा: भावापाठोपाठ बहिणीचाही मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

आळसंद (सांगली) : येथील भाळवणी रस्त्यावर राहणाऱ्या सुनील कदम यांच्या राहत्या घरात मण्यार जातीच्या सर्पाने दंश केल्याने सख्ख्या भावाच्या पाठोपाठ बहीण सायली वृषभ जाधव (Sayli Jadhav) (वय २४) यांचा सांगलीच्या (Sangli) वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सायलीच्या मृत्यूने परिसर शोकसागरात बुडाला आहे.

बुधवारी (ता. ६) रात्री जेवण झाल्यानंतर विराज यांच्यासह सर्वजण झोपले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास मण्यारने विराज सुनील कदम (वय १६) याला दंश केला. हा प्रकार नातेवाइकांच्या रात्री उशिरा लक्षात आला. रुग्णालयात दाखल करीत असताना विराजला मृत्यूने कवटाळले. विराजच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम शुक्रवारी (ता‌. ८) होता. गुरुवारी रात्री सर्वजण झोपले असताना बसलेल्या मण्यार सर्पाने माहेरी आलेल्या बहीण सायली‌ला दंश केला. तिला विटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून सांगलीला वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. अखेर तिचा तब्बल आठ दिवसांनी मृत्यू झाला. आज (ता. १६) सकाळी नऊ वाजता सायलीच्या पार्थिवाला शोकाकुल वातावरणात पती वृषभ यांनी मुखाग्नी दिला. सायलीला शरण्या ही एक वर्षाची मुलगी आहे.

अनेकांच्या चुली पेटल्या नाहीत.

आळसंदमध्ये सुनील कदम हे शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. अत्यंत मनमिळाऊ असणारे कदम कुटुंबीय. आठ दिवसांच्या फरकाने बहीण-भावाला मृत्यूने कवटाळले. त्यांच्या जाण्याने परिसर शोकसागरात बुडला आहे. आज पहाटे सायलीच्या निधनाची वार्ता कानी पडली. अनेकांनी दुपारपर्यंत चुली पेटवल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वरंध घाटात दरडी कोसळल्या, २७ गाड्यांमध्ये ७० ते ८० प्रवासी रात्रभर अडकले; बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, १० दरडी हटवल्या

बाबा गेल्यानंतर आई अचानक एकटी पडली... प्रार्थना बेहरेने सांगितला वडील गेल्यानंतरचा भावुक प्रवास

Latest Marathi News Live Update : आळंदी आणि देहूमध्ये न जाता पुण्यातून पालखीमध्ये सहभागी व्हा, प्रशासनाचे वारकऱ्यांना आवाहन

Panvel: पनवेलमध्ये दुर्दैवी घटना! गाडेश्वर धरण परिसरात ओढ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

Pune Flood: पवना नदीला पूर! जांबे गावात घरांना पाण्याचा वेढा; एनडीआरएफकडून २५ नागरिकांची सुखरूप सुटका

SCROLL FOR NEXT