Superintendent of Police communication Mobile for complaints kolhapur  sakal
कोल्हापूर

पोलिस अधीक्षकांचा संवादाला प्रतिसाद...तक्रारींसाठी मोबाईलचा आधार

रोज आठ ते दहा कॉल, २५ व्हॉट्‌सॲप मेसेज; तक्रारींसाठी मोबाईल क्रमांक सर्वसामान्यांना आधार

- लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : साहेब! माझी फसवणूक झाली आहे, एफआयआर घेत नाहीत, नोंद घेतली मात्र पुढे काय झाले कळले नाही, पोलिस ठाण्यात चांगला प्रतिसाद मिळाला, पोलिस तातडीने पोचले, मला पोलिसांची मदत पाहिजे आहे, असे एक, ना अनेक जण रोज थेट पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्याशी संवाद साधतात. जिल्ह्यातील अनेक भागांतून महिला, मुली, नागरिक, ज्येष्ठ नागरिक त्यांच्याशी बोलतात. यासाठी पोलिस अधीक्षकांनी जाहीर केलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर होत आहे. विशेष म्हणजे केवळ व्हॉट्‌सॲप मॅसेजद्वारेही नागरिक थेट पोलिस अधीक्षक कार्यालयाशी जोडले आहेत.

पोलिसांचा हद्दीत किती संपर्क आहे, यावर गुन्ह्यांचा तपास होणे किंवा ते प्रतिबंध करणे हे अवलंबून असते. त्यानुसार तेथील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अवलंबून असते. अनेक तक्रारदारांना ठाण्यात अपमानाला सामोरे जावे लागते. काहींना एका कॉलवरही मदत मिळते, असे एक ना अनेक प्रकार रोज जिल्ह्यात घडतात. यातून थेट पोलिस अधीक्षकांपर्यंत पोचणे अवघड असते. अनेक व्यक्ती पोलिसांपासून दूरच राहतात. अन्याय सहन करतात. अवैध धंद्यावर भाष्य करण्याकडेही दुर्लक्ष करतात. यातून पुढे गुन्हेगारी, तक्रारी वाढत जातात.

मिस्डकॉलवरही संपर्क

रोज किमान आठ-दहा कॉल या क्रमांकावर येतात. किमान २०-२५ मेसेज थेट व्हॉट्‌सॲपद्वारे मिळतात. हा क्रमांक अधीक्षक बलकवडे यांच्याकडेच असल्याने त्याची दखल तातडीने घेतली जाते. काही वेळा बैठकांत असल्याने कॉल स्वीकारता येत नाहीत; पण मिस्डकॉलवर अधीक्षक बलकवडे संपर्क साधतात. आवश्‍यक तेथे संबंधित ठाण्याकडून त्याचा पाठपुरावा केला जातो.

ज्येष्ठ नागरिकांपासून महिलांचेही कॉल-एसएमएस येतात. वाहतूक कोंडीपासून अवैध धंद्यापर्यंत आणि चोरी, तक्रार घेतली नाही, पोलिसांनी प्रतिसाद दिला, अशा सर्वच स्तरांतील माहिती थेट मिळते. या उपक्रमांमुळे ठाण्यातील प्रभारी अधिकारी-कर्मचारीही नागरिकांना योग्य वागणूक देतात. तक्रारीही निकाली निघतात. असा दुहेरी फायदा आहे.

- शैलेश बलकवडे, पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT