Superintendent of Police Dr. Deshmukh story by rajesh more 
कोल्हापूर

"सिंघम स्टाईल' कोल्हापूरकरांच्या ह्दयात कायम  : ''कोल्हापूर राहणार नेहमी स्मरणात''

राजेश मोरे

कोल्हापूर : पोलिस दल हीच माझी ताकद आहे. जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी व काळे धंदे मोडून काढण्यासाठी आम्ही पोलिसांचा संघ तयार केला. या संघाच्या माध्यमातून गुन्हेगारी व काळे धंदे मोडून काढता आले. त्याचे श्रेय माझ्या पोलिस दलाला जाते. भविष्यातही माझे पोलिस बांधव गुन्हेगारीला थारा देणार नाहीत, असा विश्‍वास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज व्यक्त केला. चांगले काम करणाऱ्यांना डोक्‍यावर घेणारे "कोल्हापूर' कायम माझ्या स्मरणात राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. 

पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दोन वर्षांहून अधिक काळ कोल्हापूर जिल्ह्याची पोलिस अधीक्षक म्हणून धुरा सांभाळली. त्यांनी तेरा संघटित गुन्हेगारांवर मोका अंतर्गत कारवाई केली. मटका, जुगार असे काळे धंदे मोडून काढले. सर्वसामान्यांच्या ह्दयात त्यांची "सिंघम स्टाईल' इमेज कोरली गेली. गुन्हेगारी वर्तुळ तर अक्षरश: भेदरून गेले. काल ( 17) 
त्यांची पुणे ग्रामीणला बदली झाली. कोल्हापुरातून ते पुण्याला सोमवारी ( 21) रवाना होण्याची शक्‍यता आहे. तत्पूर्वी, त्यांनी जिल्ह्यातील काम करताना आलेल्या अनुभवाचे गाठोडे आज खुले केले. 

डॉ. देशमुख म्हणाले, ""जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारांसह व्हाईट कॉलर काळे धंदेवाल्यांच्या मुसक्‍या आवळल्या तर कायदा सुव्यवस्थेचा फारसा प्रश्‍न उरत नाही. अशा संघटित गुन्हेगारांविरोधात आम्हीही आमच्या पोलिसांचा संघ तयार केला. या संघाच्या माध्यमातून विष्णोई, तेलनाडे, मुल्ला गॅंग विरोधात हात घातला. अमंली पदार्थ तस्करांच्या मुसक्‍या आवळ्यात आम्हाला आम्हाला यश आले. जिल्ह्यातील पोलिसांचे चांगले नाव आहे. त्यांचा लोकांशी चांगला संपर्क आहे. त्याचा उपयोग आम्हाला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी झाला. सरळ व स्वच्छ हेतूने काम करणाऱ्याला कोणाचाही दबाब येत नाही, हेही आम्हाला दिसून आले. चांगले काम करणाऱ्या संघातील पोलिसांना मी शाबासकी देण्याचा प्रयत्न केला. पण, चुकीचे काम करणाऱ्यांविरोधात मला कठोर भूमिकाही घ्यावी लागली.'' 

ते म्हणाले, ""प्रशासनाला मदत करण्याची भूमिका कोल्हापूरकरांची आहे. आम्ही एक पाऊल पुढे टाकले तर येथील लोक सहकार्यासाठी पाच पावले पुढे येतात. इथल्या लोकांना शहराबद्दल खूप स्वाभिमान आहे. चांगले काम करणाऱ्यांना येथील लोक डोक्‍यावर घेतात. त्याचाही अनुभव मी पोलिस प्रमुख या नात्याने घेतला. गडचिरोलीतून कोल्हापुरात बदली झाल्यानंतर मराठा आरक्षण, 2019 ची निवडणूक, महापूर, विधानसभा त्यापाठोपाठ आलेला कोरोना अशी एकापाठोपाठ एक आव्हानात्मक जबाबदाऱ्या पेलाव्या लागल्या. पण, या कामात संपूर्ण जिल्हा पोलिस टीम माझ्यासोबत असल्याने मला कधी एकटेपणा वाटला नाही.'' यावेळी अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, श्रीनिवास घाडगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते. 

हेही वाचा- कारखान्यांची होणार कसरत : ट्रक-ट्रॅक्‍टर, बैलगाड्या मिळणे अवघड - ​

"सिंघम' देशमुखांची प्रांजळ कबुली... 
महापूर, कोविड अशा आपत्तीजन्य परिस्थितीत दररोजच्या पोलिसिंगला ब्रेक लागला. पोलिस मुख्यालयातील प्रलंबित प्रश्‍न व पोलिसांसाठीचे घरकुलबाबत प्रयत्न केले. निधी अभावी पूर्णत्वाबाबत काही उणिवा राहील्या. पोलिस कल्याण निधीसाठी आवश्‍यक ते प्रयत्न केले. आणखी निधी वाढला पाहिजे. पाचगाव, शाहूवाडी, राधानगरी, आजरा येथे सीसीटीव्हीच्या योजना उभारल्या. त्याचे जाळे संपूर्ण जिल्ह्यात उभे करण्याचा संकल्प पूर्ण झाला नाही. शहरातील वाहतुकीच्या नियोजनासाठी 10 पॉईंटवर लक्ष केंद्रित केले होते. संभाजीनगर स्टॅंन्डचा प्रभावी वापर, रस्त्यावरील मार्केट, फेरीवाल्यांचे पुर्नवसन हे मुद्दे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अखत्यारित येत असल्याने त्याचे नियोजन करता आले नसल्याची खंतही डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली. 

संपादन - अर्चना बनगे

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT