Supply Of Goods In Home By The Ichalkaranji Municipality 
कोल्हापूर

इचलकरंजीत पालिकेतर्फे वस्तूंचा पुरवठा घरपोच

सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : "घरपोच जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा' ही पालिकेची संकल्पना भाजीपाला विक्रेते, दुकानदार व इतर सेवा देणाऱ्यांच्यात रुचत आहे. घरपोच सेवा देणाऱ्या इच्छुकांसाठी पालिकेने संकेतस्थळाची निर्मिती केली असून, सध्या घरपोच सेवा देणाऱ्या 80 जणांनी नोंदणी केली आहे. सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या एकूण 38 भाजीपाला विक्रेते व किराणा दुकानांना घरपोच सेवा देण्यासाठी परवानगी दिली आहे. यात लॉंड्री, इलेक्‍ट्रीशन व अन्य सेवांचा समावेश आहे. 

पालिकेच्या संकेतस्थळावर जसजसे नोंदणी होईल, त्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून व पालिकेच्या अधिकृत फेसबुक वेबसाईटवरून घरपोच सेवा देणाऱ्यांची यादी प्रसारित केली जात आहे. शहरात जीवनावश्‍यक खरेदीसाठी विनाकारण गर्दी टाळण्यासाठी पालिकेचा हा चांगला उपक्रम आहे. शहरातील जास्तीत जास्त भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदारांना यात सामावून घेतले जाणार आहे, असे उपमुख्याधिकारी केतन गुजर यांनी सांगितले. 

क्विक ऍप लवकरच 
पालिका प्रशासन धोरणात्मक निर्णय घेऊन जीवनावश्‍यक साहित्यासह इतर सेवा घरपोच देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्व सेवांची माहिती नागरिकांना आपल्या मोबाईल ऍपवरच मिळेल. अशा प्रकारे एखादे क्वीक ऍप तयार करून सर्व साहित्य, सेवांची घरपोच सुविधा त्वरित मिळणार आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT