supply water to Ichalkaranji from Dudhganga river was opposed by a resolution in the meeting of Radhanagari Panchayat Samiti 
कोल्हापूर

इचलकरंजीला पाणी देण्यास राधानगरी पं. स. सभेत विरोध...

राजू पाटील

राधानगरी - दूधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणीपुरवठा करण्याच्या प्रस्तावित योजनेला राधानगरी पंचायत समितीच्या सभेत ठरावाद्वारे विरोध दर्शविण्यात आला. सभापती दीपाली पाटील अध्यक्षस्थानी होत्या.

प्रस्तावित योजनेमुळे भविष्यात काळम्मावाडी धरणाच्या लाभक्षेत्रात पाण्याची कमतरता भासेल, यामुळे या योजनेला कायम विरोध राहील, असे उपसभापती उत्तम पाटील यांनी स्पष्ट केले. सभेत नवोदय विद्यालय प्रवेशास पात्र विद्यार्थी, कोरोना संकटात मदत करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. गतवर्षी जे अपंग समाजकल्याण विभागाकडील योजनांपासून वंचित राहिले, त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे कॅम्प आयोजित करून आवश्‍यक साहित्य वितरण करावे, अशी सूचना सभेत जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घारे यांनी केली.

वैयक्तिक लाभाच्या योजना रद्द करण्याची मागणी सदस्य मोहन पाटील यांनी सभेत केली. तालुक्‍यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रिक्त पदे भरून आरोग्यसेवा सक्षम करावी, दाजीपूर, म्हासुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पदनिर्मिती प्रस्तावाला तत्काळ मंजुरीची कार्यवाही व्हावी, अशी मागणी सदस्यांनी सभेत लावून धरली. पिरळ, पडळी पुलांच्या संरक्षक कठड्यांची पडझड झाल्याने हे पूल वाहतुकीस धोकादायक बनल्याकडेही सदस्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. कृषी विभागाच्या पुरस्कारासाठी खंडाने जमीन कसणारे प्रयोगशील शेतकरी पात्र ठरण्यासाठी निकषात बदलाची मागणीही 
सभेत झाली.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT