Survey Of 300 Farmers In Ajara For Power Connections Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

वीज जोडण्यांसाठी आजऱ्यात 300 शेतकऱ्यांचे सर्वेक्षण

रणजित कालेकर

आजरा : कृषी पंपाच्या वीज जोडणीबाबत आतापर्यंत अनेक योजना शासनाच्या वतीने राबविण्यात आल्या आहेत, पण तांत्रिक व अन्य बाबींमुळे वीज जोडणी देण्याबाबत म्हणावी तशी गती मिळालेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाने नुकतेच परिपत्रक काढून योजनामध्ये बदल सुचवले आहेत. यामध्ये बदलांबरोबर शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्याबाबत स्वायत्तताही दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने वीज जोडणी मिळण्यास मदत होणार आहे. दरम्यान, आजरा तालुक्‍यात 300 शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. 

दीड वर्षापासून एच. व्ही. डी. एस. (उच्च दाब वितरण प्रणाली) ची योजना महावितरणकडून राबविली जात आहे, पण वीज जोडण्या देण्याबाबतच्या म्हणावी तशी गती मिळालेली नाही. नुकतीच कृषी पंपांना वीजवितरणाबाबत मंत्री मंडळाने बैठक घेऊन परिपत्रक काढले. यामध्ये बदल सुचवले असून, जुन्या रोहित्रांवर (डी पी) वीज भार शिल्लक असेल तर कृषी पंपासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्याला 30 मीटरपर्यंत सर्व्हिस वायर टाकून वीज जोडणी दिली जाईल.

200 मीटरपर्यंत लघुदाब वाहिनी किंवा एअर बेंच केबल (एबी) टाकून वीज देणार आहे. 200 मीटर ते 600 मीटरपर्यंत एच. व्ही. डी. एस. (उच्च दाब वितरण प्रणाली) प्रमाणे वीजपुरवठा केला जाईल. उच्च दाब वाहिनीचे 600 मीटरपेक्षा अधिक अंतर असेल, तर सौरऊर्जा पंप दिला जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना स्वायत्ततादेखील दिली आहे. शेतकऱ्यांनी स्व खर्चाने वीज जोडणी जोडून घेतली, तर त्याला येणाऱ्या विजेच्या बिलातून वीज जोडणीचा खर्च परत मिळणार आहे. स्वतंत्र रोहित्र (डीपी) उभा करून वीज मिळवणे हे वेळ खाणारे होते. त्याचबरोबर अल्पभूधारक शेतकऱ्यांनी स्वतंत्र रोहित्र (डीपी) उभा करणे अडचणीचे होते.

या अडचणी लक्षात घेऊन वीज जोडणीत नवे बदल केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीज जोडण्या तातडीने मिळण्यास मदत झाली आहे. दरम्यान, 2018 नंतर 345 प्रलंबित वीज जोडण्या आहेत. त्यांचे काम नव्या पद्धतीने होणार असल्याचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता दयानंद कमतगी यांनी सांगितले. 

दृष्टिक्षेप 
- आजऱ्यात 2018 मार्चपर्यंत उच्च दाब वितरण प्रणालीतून 289 वीज जोडणीची मागणी 
- 180 वीज जोडण्या पूर्ण झाल्या असून, 109 वीज जोडण्या या महिन्यात पूर्ण होणार. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT