The survey of the parties is the basis for candidature 
कोल्हापूर

पक्षांचा सर्व्हे ठरतोय उमेदवारीसाठी आधार 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राजकीय पक्षांच्या सर्व्हेवरच इच्छुकांची निवडणुकीतील उमेदवारी फायनल होणार आहेत. कॉंग्रेसचा पहिल्या टप्यातील सर्व्हे पूर्ण झाल्याचे समजते. राष्ट्रवादी कॉंग्रेसही सर्व्हेच्या आधारे प्रभागातील नशीब आजमावणार आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीपासून खासगी सर्व्हे हा प्रमूख पक्षांचा आधार बनला आहे. प्रभागात पक्षाची स्थिती काय आहे? कोणाला तिकीट दिले तर निवडून येण्याची संधी आहे, याची माहिती नेते सर्व्हेच्या माध्यमातून जमा करतात. मतदानाच्या तारखेपर्यंत तीन ते चार सर्व्हे होतात. प्रत्येक सर्व्हेवेळी उमेदवाराची स्थिती नेमकी काय आहे? याची माहिती मिळत जाते. 


कॉंग्रेसने पहिल्या टप्यातील सर्व्हे पूर्ण केल्याचे समजते. 81 प्रभागात विद्यमान नगरसेवक अथवा नवख्या उमेदवाराला तिकीट दिल्यानंतर पुढे काय रिझर्ल्ट मिळेल, याची माहिती सर्व्हेच्या माध्यमातून घेतली आहे. दोन्ही कॉग्रेसची तिकीटे या सर्व्हेवरच अवंलबून आहेत. विधानसभा निवडणुकीलाही सर्व्हेचा आधार घेतला जातो. खासगी कंपन्यातर्फे सर्व्हे केला जातो. कंपनीचे लोक प्रत्येक प्रभागात फिरून संबंधित पक्षाची तसेच संभाव्य उमेदवाराची माहिती घेतात. गेल्यावेळी कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीने सर्व्हेच्या आधारेच किती जागांवर उमेदवार विजयी होऊ शकतात, याचा अंदाज बांधला जातो. 
कॉंग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना भाजप-ताराराणी आघाडीकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. एकेका प्रभागात किमान पाच जण पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. यातील कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही, असा नेत्यांसमोर प्रश्‍न असतो. सर्व्हे हा प्राथमिक बेस समजून संभाव्य उमेदवारीबाबत चाचपणी केली जाते. पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासाठी विधानपरिषद निवडणूक महत्वाची आहे. 
त्यासाठी महापालिकेतील सदस्य संख्या अधिक असणे गरजेचे आहे. त्यामुळेच कॉग्रेसने सर्व्हेत आघाडी घेतल्याचे समजते. 
सध्या कॉंग्रेसचे तिकीटावरील 28 नगरसेवक आहेत. ही संख्या 40 पर्यंत नेण्याचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्रवादीला गेल्या निवडणुकीत केवळ 15 जागांवर समाधान मानावे लागले. यावेळी किमान 20 जागा जिंकण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: वैभववर BCCI चा मोठा विश्वास; गौतम गंभीरला मिळाल्या खास सूचना, संजू सॅमसनचे संघातील स्थान धोक्यात

Paithan Wari: पैठणहून संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान; गोदावरी काठी भाविकांची गर्दी

ATM Cash Shortage: एटीएममध्ये पैसे का नाहीत? अनेक शहरांमध्ये 'कॅश'चा तुटवडा; आरबीआयचं मोठं पाऊल

Latest Marathi News Update : पैठणहून संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Pune Mumbai Railway Route Close : मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे मार्ग बुधवारी देखील राहणार बंद; दिवसभरात १४ गाड्या रद्द

SCROLL FOR NEXT