Survived through proper planning ... 
कोल्हापूर

योग्य नियोजनातून जगवली झाले... 

केरबा जाधव

धामोड : म्हासूर्ली (ता. राधानगरी) येथील दहा हेक्‍टर क्षेत्रावर दोन वर्षापूर्वी लावलेल्या 33 हजार वृक्षांनी आता कात टाकली आहे. येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग व वणव्यापासून पासून वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत. नागपूर येथील वनविभागाच्या पथकाने देखील या ठिकाणी भेट देऊन कौतुक केले आहे. 

काही वर्षापासून केवळ वृक्षारोपणाचे फॅड आले आहे. पण वृक्षांचे संगोपन करण्यासाठी कायम अंधार असतो. मात्र, या बाबीला छेद देत म्हासूर्ली येथे वन विभागाच्या वतीने सन 2017-18 साली दहा हेक्‍टर क्षेत्रावर 33 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. या बीटात रुजू झालेले वनरक्षक दिनेश टिपुगडे यांनी वृक्ष जगवण्याचा निश्‍चय केला. ऐन, आवळा, जांभुळ, आंबा, खैर, हेळा, बांबू, आपटा अशा वृक्षांच्या जाती लावण्यात आल्या. सध्या रोपांची उंची सरासरी 2 ते 3 मीटर इतकी आहे. 

उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा वृक्षांना सहन कराव्या लागू नयेत म्हणून एका खड्डयामध्ये पावसाळी पाणी साठवले. त्याचे योग्य नियोजन करुन वृक्षांना पाणी देण्यात आले. सध्या ही झाडे बहरू लागली आहेत. नागपूर येथे वनविभागाच्या पथकाने या क्षेत्राला वेळोवेळी भेटी देऊन वृक्ष लागवडी बद्दल येथील वनपाल तिवडे, टिपूगडे व अन्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. 

झाडांना पाणी देण्यासाठी बाजारातून त्यांनी प्लास्टिकच्या बाटल्या विकत आणून त्या झाडांच्या जवळ कापून गाढल्या आहेत. या बाटल्यात ते पाणी भरतात, त्यामुळे झाडांना पाण्याची कमतरता भासत नाही. 
- दिनेश टिपुगडे, वनरक्षक 


दृष्टिक्षेप 
- म्हासुर्लीत दहा हेक्‍टर क्षेत्रावर वृक्षारोपण 
- जांभूळ, आंबा, खैर, हेळा वृक्षांच्या जाती 
- रोपांची उंची 2 ते 3 मीटर 
- खड्डयात पावसाचे पाणी साठवून झाडांना पाणी देण्याचे नियजन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT