Suvarna Shinde Diwali Panati esakal
कोल्हापूर

Diwali Festival : मुलाचं निधन, पतीही पायानं अधू..; दुःख बाजूला सारुन सुवर्णा शिंदेंच्या पणत्या करणार अंगण 'तेजोमय'

पतीसोबत आपले जगणेही सुसह्य व्हावे, यासाठी त्या धडपडत असतात.

नंदिनी नरेवाडी

सुवर्णा यांचे पती सेंट्रिंगचे काम करतात; मात्र तेही कामावर पाय निसटून पडले आणि काम थांबले. त्यानंतर सुवर्णा खचल्या नाहीत.

कोल्हापूर : महाद्वार रोडवरील (Mahadwar Road) पणत्या (Diwali Panati) विक्रेत्या सुवर्णा शिंदे (Suvarna Shinde) आपले दुःख बाजूला सारत आनंदाची पेरणी करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. विविध प्रकारच्या पणत्यांची विक्री करत त्या यंदाच्या दिवाळीत (Diwali) ग्राहकांच्या अंगणात सुखाचा प्रकाश पेरणार आहेत.

सुवर्णा शिंदे या शिवाजी पेठेत राहतात. रोज खरी कॉर्नर ते बिनखांबी गणेश मंदिर या मार्गावर सायंकाळी फुले, भाजी विकतात. त्यांच्या मुलाचे वयाच्या बाविसाव्या वर्षी निधन झाले. सुवर्णा यांचे पती सेंट्रिंगचे काम करतात; मात्र तेही कामावर पाय निसटून पडले आणि काम थांबले. त्यानंतर सुवर्णा खचल्या नाहीत.

पतीसोबत आपले जगणेही सुसह्य व्हावे, यासाठी त्या धडपडत असतात. विविध वस्तुंच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यात खर्च भागेल, याची काळजी घेतात. सकाळी रिकाम्या हाताने घराबाहेर पडत असल्या तरी सायंकाळी घरात पुन्हा जाताना समाधानाचे तेज घेऊन परततात.

पणत्या खरेदी करून शिंदेंना बळ देऊया...

दीपोत्सवाचे परंपरागत तेज उजळवण्यासाठी ही पणती खरेदी करा. आणि सुवर्णा शिंदे यांच्या अर्थकारणाला बळ द्या.

-सुवर्णा शिंदे यांचा संपर्क : 7262007496

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT