Swab inspection system collapses in Kolhapur 
कोल्हापूर

कोल्हापुरात स्वॅब तपासणी यंत्रणा कोलमडली ; प्रमुखांचे मौन

शिवाजी यादव

कोल्हापूर - वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शेंडापार्क येथील सूक्ष्मजीव शास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत कोरोना स्वॅब तपासणी गेली १६ तास बंद होती. निर्जंतुकीकरणासाठी तपासणी बंद ठेवली आहे. स्वॅब तपासणी प्रलंबित राहू नये, यासाठी अन्य पर्याय म्हणून खासगी व शासकीय प्रयोगशाळांकडे स्वॅब तपासणीसाठी पाठवल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत बहुतेक वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनी मौन पाळले. 

याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी : शेंडापार्क प्रयोगशाळेत स्वॅब तपासणीसाठी तीन मशीन आहेत. यातील एकामध्ये साडेचार तासांत ९६ स्वॅब, तर दुसऱ्यात साडेपाच तासांत ९६ स्वॅबची तपासणी होते. तिसऱ्या मशीनमध्ये शंभरपेक्षा जास्त स्वॅब तपासले जातात. 

स्वॅब तपासणीसाठी लागणारे विशिष्ट रसायन कमी पडले, मशीनमध्ये तांत्रिक बिघाड होता आणि लॅब निर्जंतुकीकरणासाठी तपासणी बंद होती, अशी तीन वेगवेगळी कारणे सांगण्यात आली. अशात तीन हजारांवर स्वॅब तपासणीच्या प्रतिक्षेत राहिले. त्यामुळे तातडीने दीड हजारांवर स्वॅब पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठविले गेले. काही स्वॅब कृष्णा, मेट्रो व डॉ. डी. वाय. पाटील लॅबमध्ये पाठविले. 

स्वॅब तपासणीसाठी लागणारी साधनसामग्री शासन पुरविते. काही वेळा तपासणीसाठी यंत्रणा वापरल्याबद्दल काही रक्कमही खासगी लॅबला द्यावी लागेल; मात्र ती कोणी कशी द्यावी, याचा पेच आहे. त्याचे उत्तर तूर्त प्रशासनाने दिलेली नाही. दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्‍टरांची बैठक घेतली. त्यातही स्वॅब तपासणीवर चर्चा झाली. मशीन जिल्हा परिषदेने खरेदी केल्याने पर्यायी व्यवस्थाही जिल्हा परिषदेनेच करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पर्याय म्हणून दुपारी शहरातील एका खासगी लॅबमध्ये स्वॅब तपासणी मशीन तात्पुरते बसविल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मौन 

स्वॅब तपासणी का बंद आहे, याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही माहिती रात्री उशिरापर्यंत दिलेली नाही. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी तर जिल्हा परिषदेशी संपर्क साधण्यास सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तेही फोन उचलू शकले नाहीत. जिल्हा शल्यचिकित्सकांनी हा माझ्या कक्षेतील विषय नसल्याचे सांगितले. त्यामुळे प्रश्‍नाचे ठोस उत्तर मिळाले नाही.

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारण काय सांगितलं?

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT