Swabhimani Shetkari Sanghatana esakal
कोल्हापूर

Raju Shetti : ऊसदर आंदोलन चिघळलं! 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी बैलगाड्या उलथवल्या, ठिकठिकाणी पेटवले ट्रॅक्टर

टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथे उसाने भरलेल्या गाड्या उलटवून देऊन ऊस तोडणी बंद पाडली.

सकाळ डिजिटल टीम

पालकमंत्री हसन मुश्रीफ यावर चर्चा करतील, अशी अपेक्षा स्वाभिमानीकडून व्यक्त केली होती. मात्र, तीही झाली नाही.

कोल्हापूर : गेल्या गळीत हंगामातील प्रतिटन उसाला ४०० रुपयांचा दुसरा हप्ता मिळावा आणि यंदाच्या गळीत हंगामात प्रतिटन उसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari Sanghatana) पुकारलेले आंदोलन चिघळले आहे.

टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथे उसाने भरलेल्या गाड्या उलटवून देऊन ऊस तोडणी बंद पाडली. कापशी (ता. कागल) परिसरात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीचे टायर फोडण्यात आले, तर तळसंदेत (ता. हातकणंगले) येथे उसाने भरलेला ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न झाला.

जिल्ह्यात ऊस दरासाठी एक महिना आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या मागणीनुसार दर देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. मात्र, ती निष्फळ ठरली. त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यावर चर्चा करतील, अशी अपेक्षा स्वाभिमानीकडून व्यक्त केली होती. मात्र, तीही झाली नाही.

उलट गेल्यावर्षीच्या प्रतिटन उसाला ४०० रुपये दर देताच येत नाही, असे पालकमंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे आंदोलक आणखी आक्रमक झाले आहेत. आज टाकळीवाडी येथील गुरुदत्त सहकारी साखर कारखान्याची ऊस तोड सुरू होती. ही ऊस तोड रोखण्यासाठी शेकडो आंदोलन एकवटले आणि त्यांनी शेतात उसाने भरलेली बैलगाडी उलथवून लावून तोड बंद पाडली.

कापशी (ता. कागल) येथील संताजी घोरपडे कारखान्यासाठी ऊसतोड करणाऱ्या ट्रॅक्टर - ट्रॉलीच्या टायर फोडण्यात आल्या. सर्वोदय सहकारी साखर कारखाना व वसंतदादा सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस वाहतूक करताना कारंदवाडी आणि मिरजवाडी येथेही ट्रॉलीच्या टायरमधील हवा सोडण्यात आली आहे. एकूणच जिल्ह्यातून होणारी ऊस वाहतूक करणाऱ्या कारखान्यांच्या वाहनांवर हल्लाबोल सुरू केला आहे. त्यामुळे हे आंदोलन चिघळतच चालले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Megablock: एल्फिस्टनचा ब्रीज हटवण्यासाठी मध्य रेल्वेवर २३ तासांचा जम्बो ब्लॉक! पण एका अडथळ्यामुळे प्रशासनाचे काम अडचणीत; काय घडलं?

December 2025 Holiday Trip: कुटुंबासोबत करा 'या' 8 भारतीय स्थळांची सैर, ख्रिसमस अन् नवीन वर्षाचा सेलिब्रेशन होईल खास

Sachin Gujar : मॉर्निंग वॉकला बाहर पडल्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्षांच अपहरण अन् जीवघेणी मारहाण, अहिल्यानगर हादरलं! CCTV पाहा...

Mumbai Crime : कुर्ल्यात वाढदिवस सेलिब्रेशनदरम्यान मित्रांनी अंगावर पेट्रोल ओतून अब्दुल रहमानला जाळलं; धक्कादायक घटना CCTV मध्ये कैद

ईशा केसकरने सांगितलं 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडण्याचं कारण, म्हणाली...'जीवापाड मेहनत करुनही जर...'

SCROLL FOR NEXT