Swabhimani Shetkari Sanghatana Esakal
कोल्हापूर

इचलकरंजीत स्वभिमानी आक्रमक: चक्क महावितरण कार्यालयात सोडला साप

रात्रीच्या वेळी पाणी पाजताना सापडलेला सापच टेबलवर सोडला.

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : शेतीसाठी दिवसात दहा तास वीजपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी सर्व ठिकाणी स्वभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे. दरम्यान, आज इचलकरंजीत (Ichalkaranji) शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात चांगलाच गोंधळ घातला. कार्यकारी अभियंता प्रशांत राठी (Prashant Rathi) यांच्या टेबलवरच साप सोडत वीज पुरवठा देण्याची मागणी केली. महावितरणचा जोरदार निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकारानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. कार्यालयात पोलिसही दाखल झाले.

कार्यकारी अभियंता यांच्या टेबलवरच साप सोडत वीज पुरवठा देण्याची मागणी केली.

शेतीला दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी कोल्हापूरात महावितरणसमोर माजी खासदार राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. याकडे महावितरण दुर्लक्ष करत असल्याने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी पाजताना येणाऱ्या अडचणी घेऊनच शहरात शेतकऱ्यानी महावितरण कार्यालयावर आज आंदोलन केले.

जोरजोरात घोषणा देत कार्यकारी अभियंता राठी यांना घेराव घातला. दिवसा दहा तास पाणीपुरवठा वीजपुरवठा देण्याची मागणी केली. रात्रीच्या वेळी पाणी पाजताना सापडलेला सापच त्यांच्या टेबलवर सोडला. या गंभीर प्रकारानंतर महावितरणचे कर्मचारी घाबरले. प्रश्नांचा भडीमार करत कार्यकारी अभियंता राठी यांना चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन मिळत नाही तोपर्यंत या कार्यालयात बसून राहण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. पोलिसही कार्यालयात दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT