Swadhyay Booklet Given To Students Who Do Not Have Online Facility Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

ऑनलाईनची सुविधा नसणाऱ्या विध्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका देवून अभ्यासात नोंदविला शंभर टक्के सहभाग, चंदगड तालुक्‍यातील शाळेचा आदर्श उपक्रम

सुनील कोंडुसकर

चंदगड : शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथील शिक्षकांनी स्वाध्याय पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतवण्यात यश मिळवले आहे. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु आहेच, परंतु इंटरनेट रेंजअभावी काही विद्यार्थी वंचित होते. सर्वांना सहभागी करून घेण्यासाठी त्यांनी स्वाध्याय पुस्तिकेचा पर्याय शोधला आणि तो अमलातही आणला. त्यामुळे कोरोनाच्या काळातसुध्दा सर्व विद्यार्थ्यांशी जोडून घेणारी ही तालुक्‍यातील पहिली शाळा ठरली आहे. 

कोरोनामुळे सर्व शाळा बंद आहेत. ऑनलाईन अभ्यासक्रम हा पर्याय सर्वच शिक्षक वापरत आहेत, परंतु अनेक पालकांकडे ऍण्ड्रॉईड मोबाईल नाही. इंटरनेट रेंजचाही प्रश्‍न आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर शिक्षकांनीच पर्याय शोधायला सुरवात केली.

एका प्रकाशनाकडून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या सत्राची सर्व विषयांची एकत्रीत स्वाध्याय पुस्तिका आढळली. पाचवी ते सातवीसाठी वर्षभराची स्वाध्याय पुस्तिका मिळाली. शिक्षकांनी त्या खरेदी करुन विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवल्या आहेत. दररोज शिक्षकांनी दिलेल्या अभ्यासानुसार विद्यार्थ्यांनी त्या सोडवायच्या आहेत. आठवड्यातून एकदा शिक्षकांकडून त्याची तपासणी होणार आहे. यात पालकांचीही भुमिका महत्वाची आहे.

आपल्या पाल्याच्या अभ्यासाकडे त्यांनी नियमित लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान स्वाध्याय पुस्तिका वाटपाचा कार्यक्रम शाळेत घेण्यात आला. या वेळी केंद्र प्रमुख एम. टी. कांबळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा ज्योती रेडेकर, उपाध्यक्ष बसवंत पाटील यांच्यासह सदस्य उपस्थित होते. मुख्याध्यापिका भारती बैलूरकर, सुभाष सावंत यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. 

संपादन - सचिन चराटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Player Heart Attack Video : क्रिकेट खेळताना मैदानावरच खेळाडूला हृदयविकारचा तीव्र झटका; जागीच कोसळून मृत्यू

Property Tax : विरोधामुळे मिळकतकर वाढीचा निर्णय लांबणीवर; स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव पुढे ढकलला

Pali News : पशुपालकांना मोठा दिलासा! वीज बिलाच्या टेन्शनमधून सुटका; आता 'कृषी' दराने मिळणार वीज

Police Recruitment : मोठी बातमी! पोलिस भरतीला १६ फेब्रुवारीपासून प्रारंभ; १६३३ जागांसाठी तब्बल १.३९ लाख अर्ज

Latest Marathi News Live Update : सफदरजंग परिसरात एनडीएमसीच्या एका गोदामाला भीषण आग

SCROLL FOR NEXT