Swarupa Got 75 Percent Marks By Helping His Father On The Tea Tapari Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

स्वरूपाच्या यशाला कष्टाची उकळी, चहाच्या टपरीवर वडिलांना मदत करीत मिळविले 75 टक्के गुण

अशोक तोरस्कर

उत्तूर : उत्तूर (ता. आजरा) येथील बसस्थानकावर वडिलांची वडापाव-चहाची टपरी. सकाळी शाळेला जाण्यापूर्वी व शाळेतून परत आल्यावर आई-वडिलांना मदत करायची, सायंकाळी अभ्यास करायचा, असा दिनक्रम सांभाळत दहावीच्या परीक्षेत तिने 75 टक्के गुण मिळविले. स्वरूपा रवींद्र दड्डीकर असे या मुलीचे नाव असून, ती येथील उत्तूर विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिच्या यशाला कष्टाची उकळी फुटली. 

स्वरूपाच्या वडिलांचा चहा व वडापावचा व्यवसाय. या छोट्या व्यवसायात कामगार घेणे परवडत नाही. यामुळे आई-वडील, आजी, भाऊ व स्वरूपा अशी घरचीच पाच माणसे यात राबतात. वडापावचा व्यवसाय साधा वाटत असला तरी पहाटे पाचपासून यात राबावे लागते. लहानपणापासून स्वरूपा या सर्व कामात मदत करते. दुकानात आल्यावर ग्राहकांना चहा देणे, ग्लास धुणे, पैसे घेणे हे काम करते.

शाळेची वेळ अकराची. मात्र, साडेदहापर्यंत तिचे हात कामात गुंतलेले. टपरीच्या मागे उभे राहून केस विंचरायचे, वेणी घालायची आणि शाळेला धावत जायचे. सायंकाळी परत आल्यावर पुन्हा कामाला लागायचे. रात्री आठपर्यंत हा कामाचा रामरगाडा सुरूच असायचा. घरी गेल्यावर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा.

कधी-कधी दुकानात ग्राहक नसलेल्या वेळेत पुस्तकावर नजर टाकायची. अशा पद्धतीने तिने अभ्यास केला. अगदी पेपरच्या दिवशीही सकाळी दुकानात काम करूनच ती पेपरला गेली. दहावीचा ऑनलाईन निकाल लागला आणि तिला 75 टक्के गुण मिळाले. तिच्या यशाबद्दल नातेवाईकांनी कौतुक व अभिनंदन केले. ती पुढे वाणिज्य शाखेतून पदवी घेणार आहे. 

भाऊही मेहनती... 
तिचा भाऊ ओंकारही काम करीत शिक्षण घेतो. त्याला 2017 मध्ये एम.सी.सी.मध्ये (स्काऊट) राष्ट्रपती पारितोषिक मिळाले आहे. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT