The tabligi chain of Corona was broken in belgum 
कोल्हापूर

बेळगाव जिल्ह्यात 'कोरोना'ची तबलिगी साखळी तुटली ? पण 'या' नव्या कनेक्शनचा धोका...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - बेळगाव जिल्ह्यातील कोरोनाची 'तबलिगी' साखळी तुटल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे. आता बेळगाव जिल्ह्याला सर्वाधिक धोका परराज्यातून व पर जिल्ह्यातून येणाऱ्यापासून असल्याचेही आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. परराज्यातून व परजिल्ह्यातून एक हजारपेक्षा जास्त जणांनी बेळगाव जिल्ह्यात प्रवेश केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र व मुंबई- पुणे येथून आलेल्यांची संख्या जास्त आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले असले तरी त्यांचा धोका जिल्ह्याला आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रशासनाचे लक्ष आहे.

९९ जण विलगिकरण कक्षात

बेळगावातील पहिला कोरोना रुग्ण आढळला त्याचे थेट कनेक्शन दिल्ली येथील तबलिगी मरकजशी होते. त्यानंतर ८ मे पर्यंत बेळगाव जिल्ह्यात जितके कोरोना रुग्ण सापडले त्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष तबलिगी मरकजशी संबंध होता. ८ मे रोजी बेळगावात एकाच दिवशी ११ कोरोना रुग्ण सापडले त्यातील १० हिरेबागेवाडी येथील होते. १ रुग्ण रायबाग तालुक्यातील कुडची येथील होता. त्यांनतर गेल्या सात दिवसात तबलिगिशी संबंधित एकही कोरोना रुग्ण बेळगाव जिल्ह्यात सापडलेला नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागानेही सुटकेचा निःश्वास सोडला आहे. सध्या कोरोना रुग्णांशी संबंधित ५९ जण आयसोलेशन मध्ये आहेत तर ९९ जण विलगिकरण कक्षात आहेत. कोरोना रुग्णांच्या प्रथम व द्वितीय संपर्कातील सर्वांवर प्रशासनाची नजर आहे.  या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले तर कोरोनाची तबलिगी साखळी अधिकृतरीत्या तुटेल असे अधिकारी सांगतात.

१० मे रोजी निपाणी येथे संस्थात्मक विलगिकरण करण्यात आलेल्या जिल्ह्यातील २२ जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट होताच कोरोनाचे नवे अजमेर कनेक्शन पुढे आले. त्यांनतर १४ मे रोजी बेळगाव शहरात एक पॉजिटीव्ह महिला सापडली, त्यामुळे मुंबई कनेक्शन पुढे आले. मुंबई व पुणे येथून अनेकजण बेळगावात आले आहेत. त्या सर्वांची केवळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यांच्या घशातील द्राव्य घेण्यात आलेले नाही. काहीजण परवानगी न घेता, पोलिसांची नजर चुकवून बेळगावात आले आहेत व होम क्वारणटाईन झाले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. परवानगी न घेता येणाऱ्यांवर गुन्हा नोंद केला जाणार असला तरी ते प्रशासनाला सापडणार कसे? हा प्रश्न आहे. शेजारील कोल्हापूर जिल्ह्यात मुंबईकरांमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. बेळगावात त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन काय करणार हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Shortage Rumor : युद्धाच्या अफवेने 'इंधन' भडकलं! मुक्ताईनगरमध्ये 500 लिटरच्या प्लास्टिकच्या टाक्यांत भरलं जातंय पेट्रोल-डिझेल; पाहा धक्कादायक Video

Pune News: पुणे ‘आरटीओ’त लाचखोरीचा ‘कळस’; वाहननिरीक्षकाची तक्रार, पदोन्नतीला ‘ब्रेक’ची शक्यता, त्या’ बड्या धेंडांवर कारवाई होणार का?

Summer Fashion Tips: उन्हाळ्यात दिवसभर कूल, फ्रेश आणि सुपर स्टायलिश दिसायचंय? मग ‘हे’ फॅब्रिक्स नक्की ट्राय करा!

भीषण वास्तव! घरगुती गॅससाठी दाहीदिशा वणवण, अखेर हताश महिलेनं उचललं टोकाचं पाऊल; नेमकं काय घडलं?

CSK vs RR: जड्डू... जड्डू... चाहत्यांच्या घोषणा ऐकून रवींद्र जडेजा खरंच झाला इमोशनल? Video तुफान Viral

SCROLL FOR NEXT