DOCTOR DEMAND 
कोल्हापूर

डॉक्टरांना बंदोबस्त द्या, हल्लेखोरांना आवर घालण्याची पोलिक अधीक्षकांकडे मागणी

राजेश मोरे

कोल्हापूर ः जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसागणिक गंभीर होत आहे. अशा वेळी खासगी रुग्णालयांच्या मदतीने कोरोनासह अन्य गंभीर आजारांच्या रुग्णांवरील उपचार सेवा देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. अशा स्थितीत खासगी रुग्णालयावर होणारे हल्ले चिंता वाढविणारे आहेत. रुग्णालयावर हल्ला करणाऱ्यांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. त्यासाठी खासगी रुग्णालयांना प्रसंगी पोलिस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनने जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनय देशमुख यांच्याकडे केली आहे. 

गेल्या तीन दिवसांपूर्वी टाकाळा येथील खासगी रुग्णालयावर हल्ला झाला. त्यानंतर खासगी वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन सुरू आहे. शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाग्रस्तांची जिल्ह्यातील संख्या अडीच हजारांपर्यंत पोचली आहे. अशा स्थितीत शासकीय रुग्णालयात अतिगंभीर आजारातील रुग्णांवर उपचार होत आहेत. मात्र, नियमित आजारावरील गंभीर आजार, तसेच जखमींवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांची उपयुक्तता वाढली आहे. तर काही खासगी रुग्णालयातून कोरोनोग्रस्तांवरही उपचार सेवा सुरू आहे. 
वैद्यकीय सेवेचा कसोटीचा काळ आहे. वैद्यकीय सेवेतील प्रत्येक घटक झोकून देऊन सेवा बजावत आहे. मात्र, एखाद्या हल्ल्यामुळे त्यांचे मनोधैर्य खचू शकते. याचे गांभीर्य नसल्याने हल्ले होत आहेत, असे मत काही डॉक्‍टर व्यक्त करीत आहेत. 
शहरातील काही खासगी दवाखान्यात सतत अरेरावी करणारा वर्गही शहरात तयार होत आहे. अमूक कार्यकर्त्याचे बिल कमी करा, अशी दटावणी केली जाते. यात बिल कमी केले नाही, तर कधी तरी पुढे त्याचे उट्टे काढण्याचा प्रयत्न होतो. 
वैद्यकीय सेवेबाबत कोणतीही शास्त्रीय माहिती नसताना, डॉक्‍टरांकडून एखादी वैद्यकीय उपचार पूरक बाब किंवा त्यातील गुंतागुंत समजून न घेताच परस्पर गैरसमजातून हल्ले होणे गंभीर बाब मानली जात आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात अशा हल्लेखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. 

""खासगी रुग्णालयातील डॉक्‍टर असो वा वैद्यकीय कर्मचारी, सर्वजण जीवाची पर्वा न करता उपचार सेवा देत आहेत. कोरोनाचे रुग्ण सर्वच परिसरात वाढत आहेत. रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने शासकीय रुग्णालयात जागा अपुरी पडू शकते. खासगी रुग्णालयातूनही कोरोनावर उपचार सुरू होत आहेत. काही खासगी रुग्णालये दहा-दहा बेड कोरोना उपचारासाठी देत आहेत. हे डॉक्‍टरांचे योगदानही विचारात घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे असे हल्ले होऊ नयेत, यासाठी पोलिस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी केली आहे.'' 
- डॉ. ए. एम. शिर्के, अध्यक्ष, कोल्हापूर मेडिकल असोसिएशन 

संपादन - यशवंत केसरकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT