कोल्हापूर : महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहिर केलेली फेरिवाल्यांची यादी अपूर्ण आहे. त्यामुळे शहरातील सर्वच फेरीवाल्यांच्या नावांचा समावेश व्हावा तसेच फेरीवाल्यांनीही इस्टेट विभागात आपल्या नोंद कराव्यात असे आवाहन आज सर्व पक्षीय फेरिवाला कृती समितीच्या बैठकीत करण्यात आले. माजी महापौर आर. के. पोवार यांच्या अध्यक्षतेखालीही बैठक घेण्यात आली.
महापालिके तर्फे शहरातील विविध भागात अतिक्रमन निर्मुलन मोहीम राबवत आहे. यात अनेक फेरिवाल्यांचे स्टॉल्स महापालिकेकडून काढले जात आहेत. यात अनेक विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. यात गेल्या काही महिन्यांपूर्वी महापालिकेने शहरातील फेरिवाल्यांचे सर्व्हे केला. यात त्यानुसार 3 हजार 367 फेरिवाल्यांच्या नावांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहिर केली. या यादीवर फेरिवाल्यांनी आक्षेप घेतला.
महापालिकेने 2014 साली बायोमेट्रीक पध्दतीने फेरिवाल्यांना कार्ड देण्यात आली. जवळपास साडे पाच हजार फेरिवाल्यांची बायोमेट्रीक कार्ड तयार केली. त्यापैकी साडे तीन हजार फेरिवाल्यांनी कार्ड घेऊन गेले. त्यानंतर सहा वर्षात फेरिवाल्यांची संख्या आणखी वाढली आहे. असे असताना मोजक्या फेरिवाल्यांची नावे संकेतस्थळावरील यादीत आहे. म्हणजे हा सर्व्हेसक्षम पध्दतीने झालेला नाही. त्यामुळे ज्यांची नावे या यादीत नाहीत अशा फेरिवाल्यांनी आपली कागपत्रे घेऊन महापालिके इस्टेट विभागात जावून नोंदवावीत तसेच ज्यांच्या हरकती आहेत त्यांनी त्या नोंद कराव्यात असे आवाहनही यावेळी पोवार यांनी केले.
या बैठकीस माजी महापौर नंदकुमार वळंजू, प्र. द. गणपुले, दिलिप पोवार, समिर नदाफ, रघुनाथ कांबळे, सुरेश जरग, अशोक भंडारे, किशोर घाटगे आदी उपस्थित होते.
बैठकीत वाद
भाजीपाला विक्रेते भाजी मंडईत विक्रीसाठी बसतात त्यांच्याकडून पाच दहा रूपये शुल्क घेऊन पावती दिली जाते. त्यांचेही सर्व्हेक्षण करून बायोमेट्रीक द्यावे अशी मागणी भाजीवाल्या तर्फे करण्यात आली याच वेळी येते महापालिकेचे अधिकारी सचिन जाधव यांनी मंडईतील भाजी विक्रेत्यांचा सर्व्हे करणार नसल्याचे सांगताच भाजीवाल्यांनी जोरदार हरकत घेतली त्यावरून वाद झाला. अखेर येत्या बुधवारी फेरिवाल्याच्या शिष्ठमंडळा तर्फे महापालिका आयुक्तांची भेट घेऊन विविध मागण्या मांडण्याचा निर्णय श्री पोवार यांनी जाहिर केला. .
शहरातील विविध भागात भाजीपाला विक्री करण्यासाठी स्टॉल लावणाऱ्या विक्रेत्यांना बायोमेट्रीक पध्दती नोंद करून घ्यावे तसेच शहरातील अन्य विक्रेत्यांनावर सरकारी अतिक्रमन निर्मुलन कारावे केलीकरून उध्दवस्थ करू नये तर त्याचा बायोमेट्रीक पध्दतीचे अवलंब करावा अशा मागण्या फेरीवाल्यांच्या बैठकीत आज येथे करण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.