taking all those measures in the wake of Corona in palus 
कोल्हापूर

पलूस तालुक्यातील परदेशातून आलेल्या त्या ११ जणांवर आहे नजर...  

सकाळ वृत्तसेवा

पलूस - शासकीय यंत्रनेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दक्षता म्हणून परदेशातून परत आलेल्या 11 नागरिकांवर आरोग्य विभाग आणि शासकीय यंत्रणेची चोख नजर आहे.नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.असे आवाहन पलूसचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी केले आहे.

यावेळी पोळ म्हणाले, कोरोना साथीचा फैलाव होऊ नये यासाठी नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. पलूस तालुक्यातील 11 नागरिक परदेशात गेले होते. ते काही दिवसांपूर्वी घरी परतले आहेत. कोरोनाचा प्रसार परदेशातून आलेल्या नागरिकांमधून झाला आहे. कोरोनचे विषाणू परदेशातूनच आले आहेत. परदेशातून परतलेले कोणीही आजारी नाही. मात्र, दक्षता म्हणून त्यांच्यावर आरोग्य विभागाची नजर आहे.त्यांना वेगळे ठेवणे, ते गर्दीत न मिसळणे, ते आजारी पडल्यास त्याचा प्रादुर्भाव होऊ न देणे यासाठी त्यांचेवर निरिक्षण करण्यासाठी आरोग्य सेवकांची नेमणूक करण्यात आली आहे.

खबरदारी म्हणून गर्दी टाळण्यासाठी सर्व त्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.थुंकीतून कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये, यासाठी पानपट्टी, मावा, तंबाखू विक्री केंद्रे आज पासून बंद करण्यात आली आहेत.दारु दुकाने बंद करण्यात येत आहेत.सर्व समारंभ ,मेळावे रद्द करण्यात आले आहेत. तसेच, आज पलूस मधील सर्व हाँटेलला भेटी देऊन स्वच्छता व दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. सूचनांचे उल्लंघन कोणी केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. असे पोळ यांनी सांगितले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT