Taking another swab of Corona victims stopped in Belgaum 
कोल्हापूर

कोरोनाबधितांचा दुसरा स्वॅब घेणे बेळगावात बंद ; दहा दिवसानंतर थेट डिस्चार्ज

मल्लिकार्जुन मुगळी

बेळगाव - बेळगाव कोरोनाबाधीतांचा दुसरा स्वॅब घेणे बंद करण्यात आले आहे. दहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडले जात आहे. मात्र घरी गेल्यानंतर त्यांना सक्तीने चौदा दिवस होम क्वारंटाईन केले जात आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ज्या कोरोनाबाधीतांमध्ये लक्षणे कोरोनाची लक्षणे आहेत, त्यांचाच दुसरा स्वॅब घेतला आहे. दुसऱ्या स्वॅबचा अहवाल आल्यानंतर त्यांना घरी पाठविले जात आहे. आरोग्य विभागाच्या या नव्या निर्णयामुळेच बेळगाव जिल्ह्यात डिस्चार्जची संख्या वाढली आहे.14 ते 60 वयोगटात कोरोनाची प्रतिकार शक्ती निर्माण व्हावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली आहे. कोरोनाबाधीतांना होम आयसोलेशन करण्याच्या निर्णयानंतर आरोग्य विभागाचा हा सर्वात मोठा निर्णय आहे. 

आधीच्या उपचार पद्धतीनुसार कोरोनाबाधीतांचा दुसऱ्यांदा स्वॅब घेतला जात होता. त्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतरच त्याला घरी पाठविले जात होते. म्हणजेच कोरोनामुक्त झालेल्यांनाच घरी जाण्याची मुभा होती. पण आता कोरोनबाधीतांवर दहा दिवस उपचार केल्यानंतर दुसऱ्यांदा स्वॅब न घेताच घरी पाठविले जात आहे. त्यामुळे कोरोनाबाधीत व्यक्ती कोरोनामुक्त झाली आहे की नाही याची पडताळणी न करताच घरी पाठवून क्वारंटाईन केले जात आहे.

कोरोनाबाधीतांना बिम्स येथील कोविड कक्षात दाखल केल्यानंतर पहिले पाच दिवस औषधोपचार केले जात आहेत. पुढील दोन दिवस जीवनस्तव क वाढविणारी, प्रतिकार शक्ती वाढविणारी औषधे दिली जात आहेत. त्यानंतर पुढील दिवस त्या बाधीताचे निरीक्षक केले जात आहे. त्या बाधीत व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळली नाहीत तर थेट घरी पाठविले जात आहे. गेल्या चार दिवसात त्यामुळेच डिस्चार्ज संख्या वाढली आहे. कोरोनाबाधीतांवर सातत्याने वैद्यकीय उपचार केले तर त्यांच्यात प्रतिकार शक्ती वाढणार नाही. 14 ते 60 वर्षे वयोगटात नैसर्गिकरीत्या प्रतिकार शक्ती तयार झाली पाहिजे, त्यामुळे कोरोनाला प्रतिबंध बसू शकतो असे आरोग्य विभागाचे म्हणने आहे. त्यासाठीच हा धाडसी निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असतानाच आरोग्य विभागाकडून काही धाडसी निर्णय घेतले जात आहे. संस्थात्मक क्वारंटाईन बंद करणे, बाधीतांच्या संपर्कात आलेल्यांना होम क्वारंटाईन करणे, बाधीतांवर घरीच उपचार करणे असे निर्णय आधी घेतले आहेत. आता हा नवा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. 

कोरोनाबाधीतांचे दुसरा स्वॅब घेणे बंद करण्यात आले आहे. आधी दुसरा स्वॅब घेवून त्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर घरी पाठविले जात होते. आता दहा दिवसांच्या उपचारानंतर घरी पाठविले जात आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोरोनाबाधीतांमध्ये लक्षणे असतील तरच त्यांचा स्वॅब घेवून अहवाल आल्यानंतर घरी पाठविले जात आहे.

डॉ. संजय डूमगोळ, आरोग्याधिकारी

संपादन - मतीन शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT