talathi traped taking a bribe of three thousand in hupari 
कोल्हापूर

तीन हजारांची लाच घेताना हुपरीत तलाठ्याला असे पकडले रंगेहात...

सकाळवृत्तसेवा

हुपरी - शेतातील बोअरची नोंद बारा पत्रकी घालण्यासाठी दोन हजार रूपयांची लाच स्विकारताना येथील सज्जाचा तलाठी कल्लाप्पा देवाप्पा शेरखाने (वय 54,रा प्लॉट नं. 54 संभाजीपूर आण्णासाहेब चकोते शाळेसमोर जयसिंगपूर ) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडला. आज दुपारी दोन च्या सुमारास येथील मंडल व तलाठी कार्यालयात हा प्रकार घडला.

हुपरी येथील एका शेतकऱ्यांने आपल्या मालकीच्या शेतात काही दिवसांपूर्वी बोअर मारला आहे. या बोअरची सात बारा पत्रकी नोंद घालण्यासाठी त्यांनी अनेकदा तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवले. पण तलाठी कल्लाप्पा शेरखाने यांच्या कडून दाद दिली जात नव्हती.तक्रारदाराने वारंवार विचारणा केली असता तीन हजार रूपये दिल्यास सात बारा पत्रकी नोंद घालू असे म्हणत लाचेची मागणी केली.

त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून आज सापळा रचला असता कल्लाप्पा शेरखाने हा लाचेच्या तीन हजार रकमे पैकी दोन हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ सापडला.

लाप्रवि पुणेचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक, श्रीमती सुषमा चव्हाण, कोल्हापूर विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत, पोलीस हवालदार श्री. खोत, पोलीस नाईक श्री. पोरे,श्री. कदम, श्री. घोसाळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT