The tank is dilapidated, no water purification ...
The tank is dilapidated, no water purification ... 
कोल्हापूर

जुनी टाकी झाली जीर्ण, पाणी शुद्धीकरण होईना... 

अरविंद सुतार

कोनवडे : नाधवडे (ता. भुदरगड) येथे दूषित पाण्यामुळे लोकांमध्ये गॅस्ट्रो सदृश्‍य लक्षणे दिसत असून गेल्या पंधरा दिवसापासून ग्रामस्थांना जुलाब-उलट्या सुरु आहेत. अनेक रुग्ण गारगोटी प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. याकडे ग्रामपंचायतीने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने सर्व गावात साथ मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

नाधवडे येथे पिण्याच्या पाण्याची स्थिती नेहमीच गंभीर असते. येथील पाण्याची टाकी जीर्ण झाल्याने पुर्ण क्षमतेने भरला जात नाही. त्यामुळे एक दिवसाआड पाणी सोडले जाते. तसेच नदीच्या पाण्याबरोबरच अधून-मधून गावतलावात बांधलेल्या जॅकवेल मधील पाणी सोडले जाते.

हे पाणी बऱ्याच वेळा दूषित असते. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पाण्यात टीसीएल टाकणे आवश्‍यक असते. पण याकडे दुर्लक्ष होतांना दिसते. टाकी जीर्ण झाल्याने कर्मचारी टाकीवर जाण्यास धजत नाहीत. त्यामुळे लोकांना सतत गढूळ व दुषीत पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा लागत आहे. 

अनेक रुग्ण गारगोटी येथील ग्रामीण आरोग्य केंद्रात व खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. दररोज पाच-सहा रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीने लक्ष देणे आवश्‍यक असताना पुर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे लोकांतून सांगितले जात आहे. वेळीच उपाय योजना केली नाही तर गॅस्ट्रोची साथ संपूर्ण गावात पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने वेळीच लक्ष घालून साथ आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी होत आहे. 

नाधवडेतील पाण्याची टाकी पुर्ण जीर्ण झाली आहे. यामुळे कर्मचारी वर्गाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या टाकी व्यतिरिक्त पाण्यासाठी दुसरी कोणतीही सोय नाही. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी योजना मंजूर झाली आहे. तिचे काम सूरु आहे. आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधुन योग्य ती खबरदारी घेतली जाईल. 
- कांचन रायान्ना वायदंडे, सरपंच, नाधवडे 

दृष्टिक्षेप 
- दुषित पाण्यामुळे गॅस्ट्रो सदृश्‍य आजाराची साथ 
- टाकी जीर्ण झाल्याने पूर्ण क्षमतेने भरला जात नाही 
- दिवसाआड पाणी पुरवठा 
- पाण्यात शुद्धीकरणासाठी टीसीएल फवारणी नसल्याची स्थिती 
- दुषित पाणीपुरवठ्यामुळे गावात गॅस्ट्रो सदृश्‍य आजाराची साथ 
- गावात दररोज पाच-सहा दवाखान्यात होत आहेत दाखल 

कोल्हापूर 

कोल्हापूर 

संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला मुंबईचा माजी कर्णधार

Latest Marathi News Update : झारखंडमध्ये ईडीचे छापे, मंत्र्याच्या कर्मचाऱ्याकडून करोडोंची रोकड जप्त

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT